IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. 

Updated: Mar 27, 2022, 03:41 PM IST
IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. दिल्ली संघाने टॉस जिंकाला असून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा मुंबई संघाचा रेकॉर्ड यंदा मोडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॉसच्या वेळी रिषभ पंत हसत होता. रोहित शर्माकडे पाहून त्याने टॉस जिंकल्याचा हसून आनंद व्यक्त केला. टॉस जिंकला असून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.  दोन्ही संघ 30 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. मुंबई संघाने 16 तर दिल्लीने 14 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मुंबई संघाने टिम डेव्हिडला संधी दिली आहे. बीबीएलमध्ये त्याने तुफान फलंदाजी केली होती. मुंबई संघाला त्याचा फायदा होणार आहे. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसणार नाही. टिळक वर्मावर देखील नजर असणार आहे. 

दिल्ली संघात डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिख नॉर्खिया, मुस्तफिजुर रहमान आणि लुंगी एनगिडी सारखे दिग्गज खेळाडू संघातून बाहेर आहेत. त्यामुळे चात्यांची थोडीशी निराशा होऊ शकते.  नॉर्खियाला दुखापत झाली आहे. तर एनगिडी आणि मुस्ताफिजुर पहिल्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाहीत. वॉर्नर पहिले 2 तर मार्श पहिले 3 सामने खेळणार नाही.

मुंबई संघ प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक, अनमोलप्रीत, पोलार्ड, डेव्हिड, सॅम्स, एम अश्विन, बुमराह, मिल्स, थम्पी

दिल्ली संघ प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, सेफर्ट, मनदीप, रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), पॉवेल, ललित, अक्षर, शार्दुल, खलील, नागरकोटी, कुलदीप