मुंबई : यंदाच्या मेगा ऑक्शनमधून अनेक दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे. जोफ्रा आर्चर, स्टीव स्मिथ सारख्या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यानंतर आता आणखी एका घातक गोलंदाजानं मेगा ऑक्शनमधून माघार घेतली आहे.
मेगा ऑक्शनची तारखी जसजशी जवळ येत आहे तसं खेळाडू IPL मधून माघार घेण्याचं प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. यंदा स्पर्धेत 8 नाही तर 10 संघ उतरणार आहेत. प्रत्येक संघाला 3 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. आता उर्वरित खेळाडू ऑक्शनमधून सिलेक्ट करावे लागणार आहेत.
यंदा अनेक दिग्गज खेळाडूंनीही आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत एक घातक गोलंदाज देखील आहे. हा गोलंदाज मैदानात आला तरी अनेक स्टार फलंदाजांना घाम फुटतो. त्याला बॉलला बॅटने उत्तर देताना कधी दांडी गुल होईल याचा नेम नसतो.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने यंदा IPL 2022 च्या ऑक्शनमधून माघार घेतली आहे. IPL 2022 साठी तो जास्त काळ बायो बबलमध्ये राहू शकत नाही. त्यामुळे त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वैयक्तिकरित्या बायो बबलमध्ये आणखी 22 आठवडे घालवायचे नाहीत. त्यामुळे मी ऑक्शनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या दृष्टीनं ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यामी आधी महत्त्व जास्त देतो. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचं त्याने स्थानिक मीडियाला सांगितलं.
मला आयपीएलमध्ये खेळायला आवडलं असतं मात्र आता सध्या तरी मला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यानंतर मला स्वत: वर काम करून पुन्हा ऑस्ट्रेलिया टीमसाठी खेळायचं आहे. त्यासाठी आवश्यक असणारी रिफ्रेशमेंट ही मला हवी आहे.
स्टार्क आता एशेज सीरिजमध्ये देखील खेळला होता. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वन डे आणि टी 20 मालिकेसाठी देखील तो खेळणार आहे. फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांची T20I मालिका खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
स्टार्क नुकताच अॅशेस मालिकेचा भाग होता आणि पुढील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेत खेळेल, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांची T20I मालिका खेळेल.