T20 World Cup 2022 India Vs Pakistan: ''आयुष्यातली पहिली मॅच''..आणि समीर चौघुले पोहचला थेट मेलबर्नला

हास्यजत्रामध्ये आपल्याला पोट धरून हसायला लावणाऱ्या समीर चौघुलेंची ही...

Updated: Oct 23, 2022, 03:35 PM IST
T20 World Cup 2022 India Vs Pakistan: ''आयुष्यातली पहिली मॅच''..आणि समीर चौघुले पोहचला थेट मेलबर्नला  title=

T20 World Cup 2022 India Vs Pakistan:  भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं (rohit sharma indian captain) क्षेत्ररणाचा निर्णय घेतला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय मैदानातील परिस्थिती पाहून घेतल्याचं रोहित शर्मानं सांगितलं. रोहित शर्मानं आपल्या प्लेईंग 11 मध्ये पाच गोलंदाजांना स्थान दिलं आहे. तर ऋषभ पंत ऐवजी संघात दिनेश कार्तिकला स्थान दिलं आहे.

गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India)  पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव सहन करावा लागला होता. या पराभवातून टीम इंडिया सावरू शकली नाही आणि सुपर 12 फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. आता भारतीय संघाला  पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

आणखी वाचा: बायको पाकिस्तानची पण दिल है हिंदुस्थानी..ही जर्सी घालून करणार भारताला सपोर्ट

हास्यजत्रा फेम समीर चौघुलेआज  होणारी मॅच पाहायला मेलबर्न ला पोहचला आहे. दरम्यान त्याने एक इंस्टाग्रामवर लाईव्ह येत याची माहिती दिली आहे. कि '' माझ्या आयुष्यातली पहिली मॅच पाहत आहे ''  हास्यजत्रामध्ये आपल्याला पोट धरून हसायला लावणाऱ्या समीर चौघुलेंची ही पोस्ट सध्या  सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (marathi actor Sameer Chougule reached Australia watch India Vs Pakistan T20 World Cup match)

आज होणारा   सामना अतिशय रंजक होणार आहे यात शंकाच नाही.  प्रत्येक भारतीय आज टीव्हीकडे डोळे लावून बसलाय आजचा सामना भारताने जिंकावा म्हणून प्रत्येक भारतीय आज प्रार्थना करत आहेत. अशात समीर चौघुले स्वतः तिकडे उपस्थित राहून सामना पाहतोय हे त्याचसाठी भाग्यच आहे . 

आणखी वाचा: राजू श्रीवास्तवाच्या शेवटच्या व्हिडिओत मृत्यूचं भाकीत.. पत्नीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं सत्य

 

त्याच्या पोस्टवर आतापर्यंत अनेकांनी कंमेंट्स केल्या आहेत. (marathi actor Sameer Chougule reached Australia watch India Vs Pakistan T20 World Cup match)