Neeraj chopra And Manu bhaker : भारताची नेमबाजपटू मनू भाकरने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी करून एक नव्हे तर दोन मेडल्स पटकावली आहेत. मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्य पदक जिंकलं. तर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत देखील सरबज्योत सिंगसोबत मनूने दुसरं कांस्य पदक पटकावून भारताला दुसरं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं आहे. तर दुसरीकडे भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या सिल्वर थ्रोने भारताला आणखी एक पदक मिळालं. अशातच आता मनू भाकर आणि नीरज चोप्रा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याला कारण व्हायरल झालेला एक व्हिडीओ...!
मनू भाकर दोन पदकं जिंकल्यानंतर भारतात आली होती. भारतात तिचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. पण पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यासाठी मनू भाकर पुन्हा आपल्या आईसोबत पॅरिसला गेली. काल दिमाखात सांगता सोहळा पार पडला. अशातच सांगता सोहळ्यानंतर मनू भाकरच्या आईने खेळाडूंची भेट घेतली. तेव्हा मनू भाकरच्या आईने नीरज चोप्राची भेट घेतली तेव्हा मनूच्या आईने नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. त्यावेळी दोघांमध्ये काही वेळ बोलणं झालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Neeraj Chopra can be seen talking to the Manu Bhaker's mother and into the other video, Neeraj Chopra and Manu Bhaker are discussing closely..!
I'm sorry but I don't know why I am getting interested in Manu Bhaker and Neeraj Chopra pic.twitter.com/uymONMo8sj
— Priyanshu Kumar (@priyanshu__63) August 11, 2024
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ठरलं का?, लग्नाची सुपारी फोडायची का? अशी कमेंट काहींनी केलीये. तर मनूच्या आईनं जावई शोधला, असंही काहींनी म्हटलं आहे. तर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रा आणि मनू भाकर एकमेकांसह लाजत गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर आणि मिम्स पेजेसवर अनेक भन्नाट पोस्ट पहायला मिळतायेत. पण देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंविषयी अशा पोस्ट करणं योग्य आहे का? असा सवाल देखील विचारला जातोय.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये यंदा अनेक प्रेम प्रकरणं समोर आली. काही खेळाडूंनी पदक जिंकल्यानंतर खुलेआम सर्वांसमोर प्रपोज केलं. काहींनी सोबत वेडिंग रिंग्ज देखील आणल्या होत्या. काहींनी ऑन कॅमेरा किस देखील केलं होतं. ऑलिम्पिक खेळामुळे नाही तर इतर कारणांमुळेच चर्चेत येतं, या यावेळी देखील स्पष्ट झालंय.