नवी दिल्ली : आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेला धोनी बऱ्याच कालावधीनंतर पुनगागमन करत आहे. एकेकाळी भारतीय संघात सर्वोच्च असलेल्या विश्वविजेत्या या कर्णधाराकडे पुन्हा एकदा 'बाहुबली' होण्याची संधी चालून आली आहे.
दरम्यान, चौफेर टीकेचे कारण ठरलेल्या धोनीसाठी ही संधी वाटते तितकी सोपी नाही. त्यासाठी धोनीला श्रीलंकेविरूद्ध होत असलेल्या एकदिवसीय सामन्यात दमदार कामगिरी करावी लागेल. जेनेकरून त्याचे चाहते आणि प्रामुख्याने संघासह निवडसमितीलाही विश्वास बसेन की, आजुनही धोनीचा करिश्मा कायम आहे. यापू्र्वी धोनी इंग्लंडसोबत खोळल्या गेलेल्या चॅम्पीयन्स ट्रॉफीत खेळल्या गेलेल्या वेस्टईंडीज विरूद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात झळकला होता. मात्र, श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या या पाचही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून धोनी पुन्हा एकदा विक्रमाला गवसणी घालू शकतो.
एसदिवसीय सामन्यांत त्रिशतक
सध्यास्थितीला धोनी हा भारतीय संघातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू आहे. या मालिकेत ४ सामने खेळून धोनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील ३०० सामन्यांची खेळी पूर्ण करेण. २३ डिसेंबर २०१४ला डेब्यू करणारा धोनी आतापर्यंत २९६ सामने खेळला आहे. सचिन तेंडूलकर (४६३), मोहम्मद अजहरूद्दीन (३३४), सौरव गांगूली (३०८) आणि युवराज सिंह (३०१) यांच्यानंतर ३००वा सामने खेळणारा धोनी सहावा भारतीय खेळाडू ठरणार आहे.