''नवे आहेत पण छावे आहेत'', पहिल्याच आयपीएलमध्ये प्लेऑफचं मिळवलं तिकीट

IPL मध्ये यंदा दोन नव्या टीमनी उडवली दाणादाण, ट्रॉफीही मिळवण्याच्या तयारीत?

Updated: May 19, 2022, 12:07 PM IST
''नवे आहेत पण छावे आहेत'', पहिल्याच आयपीएलमध्ये प्लेऑफचं मिळवलं तिकीट title=

मुंबई : आतापर्यंत कधीही घडलं नाही ते यंदाच्या हंगामात घडलं आहे. गुजरात आणि लखनऊ या दोन नव्या टीम यंदाच्या हंगामात खेळत आहे. दोन्ही टीमची कामगिरी उत्तम आहे. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात 2 धावांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर प्लेऑफमध्ये लखनऊने आपलं प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 

आयपीएलमध्ये गुजरात टीमने 13 पैकी 10 सामने जिंकले आणि 20 पॉईंट्ससह प्लेऑफमध्ये स्थान पक्क केलं. दुसरी टीम लखनऊ सुपरजाएन्ट आहे. 14 पैकी 9 सामने जिंकून 18 पॉईंट्स मिळवले आहेत. लखनऊ दुसरी टीम आहे ज्याने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 

राजस्थान टीम तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत 5 आणि 4 ट्रॉफी मिळवणाऱ्या मुंबई आणि चेन्नई टीमला दोन नव्या टीमने बाहेर काढलं. या दोन्ही टीमची दाणादाण उडवली. 

मुंबईने गेल्या हंगामातही अत्यंत वाईट कामगिरी केली होती. यंदाच्या हंगामातही मुंबईला विशेष कामगिरी करता आली नाही. मुंबईला 13 पैकी 3 सामने जिंकण्यात यश आलं आहे. चेन्नईने 13 पैकी 4 सामने जिंकले आहेत. अत्यंत वाईट कामगिरी यावेळी दोन्ही टीमने केली. 

यंदाच्या हंगामात दोन नव्या टीमने सर्वोत्तम कामगिरी केली. यंदा ट्रॉफी देखील याच दोन घेऊन जाणार का? याची उत्सुकता वाढली आहे. खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे ज्या हार्दिक पांड्याला टीममधून बाहेर बसावं लागलं आज तोच गुजरातचं नेतृत्व उत्तम पद्धतीने करत असल्याचं दिसत आहे.