मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू घेणार क्रिकेटमधून संन्यास?

आपल्या अनोख्या अॅक्शन, वेगवान आणि अचूक यॉर्करने बॅट्समन्सला घाम आणणारा खेळाडू लवकरच संन्यास घेणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 9, 2018, 12:17 PM IST
मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू घेणार क्रिकेटमधून संन्यास? title=

नवी दिल्ली : आपल्या अनोख्या अॅक्शन, वेगवान आणि अचूक यॉर्करने बॅट्समन्सला घाम आणणारा खेळाडू लवकरच संन्यास घेणार आहे.

कोण आहे तो खेळाडू

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीत आता ती धार नाही राहिली ज्याच्यामुळे बॅट्समनला घाम सुटायचा. 34 वर्षाच्या मलिंगाने श्रीलंकेसाठी 30 कसोटी, 204 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळलेले आहेत. या वयात एक वेगवान गोलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुर्नरागमन करणे फारच अवघड आहे. यातच आता मलिंगा क्रिकेटला अलविदा म्हणण्याची तयारी करतो आहे.

काय घेतोय संन्यास

मलिंगाने त्यांच्या एका विधानामध्ये म्हटले आहे की त्यांनी आता मानसिकरित्या तो थकला आहे. मला वाटत नाही की मी अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल.'

क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर मलिंगा श्रीलंकेसाठी स्पोर्टिंग स्टाफ म्हणून काम करु इच्छितो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणे त्यांच्यासाठी कठीण आहे पण अशा प्रकारे तो संघाला वेगवेगळ्या प्रकारे आपली सेवा देऊ इच्छितो. मुंबई इंडियन्सने देखील त्याला खेळाडू म्हणून घेण्यापेक्षा सपोर्टींग स्टाफ म्हणून आपल्या संघात घेतलं आहे.