विजयानंतर धोनीबाबत असं काही बोलला कोहली

भारतीय कर्णधार विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विजय मिळवल्यानंतर गोलंदाजांचं कौतूक करत म्हटलं की, 'बॉलर्सने दबाव ठेवल्यामुळे महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या आणि टीमचा विजय झाला.'

Updated: Jun 12, 2017, 11:44 AM IST
विजयानंतर धोनीबाबत असं काही बोलला कोहली title=

लंडन : भारतीय कर्णधार विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विजय मिळवल्यानंतर गोलंदाजांचं कौतूक करत म्हटलं की, 'बॉलर्सने दबाव ठेवल्यामुळे महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या आणि टीमचा विजय झाला.'

भारताने लंडनच्या ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत चॅम्पियंस ट्रॉफी-2017 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये भारत १५ जूनला बांगलादेशशी भिडणार आहे.

महेंद्र सिंह धोनीबद्दल बोलतांना कोहलीने म्हटलं की, 'अशा अनुभवी खेळाडूचा सल्ला नेहमीच महत्त्वपूर्ण असतो. अशा अनुभवी खेळाडूचा सल्ला नेहमी बहुमुल्य असतो.'