तुला आथियाची शप्पथ...; चाहत्याने KL Rahul ला का दिली आथियाची शप्पथ?

मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या सामन्यात राहुलने दुसरं शतक झळकावलं आहे.

Updated: Apr 26, 2022, 12:18 PM IST
तुला आथियाची शप्पथ...; चाहत्याने KL Rahul ला का दिली आथियाची शप्पथ? title=

मुंबई : इंडियन क्रिकेट टीमचा फलंदाज आणि आयपीएलच्या लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार केएल राहुल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या सिझनमध्ये केएल राहुलची बॅट थांबण्याचं नावच घेत नाहीये. मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या सामन्यात राहुलने दुसरं शतक झळकावलं आहे. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर केएल राहुलची जोरदार चर्चा होती.

अशातच केएल राहुलच्या एका चाहत्याने त्याला चक्का आथिया शेट्टीची शपथ घालत एक भन्नाट मागणी केली आहे. या चाहत्याचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. 

सोशल मीडियावर एका चाहत्याने राहुलला त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अथिया शेट्टीची शपथ घेऊन फॉर्ममध्ये राहण्यास सांगितले आहे. यावेळी एका युझरने लिहिलं, राहुल तुला आथियाची शपथ आहे की, तुझा सध्याचा फॉर्म तु आपल्या पुढच्या आयसीसी टुर्नामेंटमध्ये कायम ठेवायचा.  तुझी आम्हाला खूप गरज आहे. 

भारतीय क्रिकेट टीम ICC स्पर्धांच्या चांगली कामगिरी करताना दिसत नाही. 2017 ची चॅम्पियन ट्रॉफी फायनल, वर्ल्ड कप 2019 ची सेमीफायनल यामध्ये टीम इंडियाची खराब कामगिरी दिसून आली. यासाठी चाहत्याने केएल राहुलकडे ही खास मागणी केली आहे. 

केएल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात त्याने शतकं मारली आहेत. टीम इंडियासाठी ही देखील दिलासा देणारी बातमी आहे कारण या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्डकप स्पर्धेत केएल राहुलसाठी फॉर्ममध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे.