IPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोल

Kevin pietersen On Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन (Mumbai Indians) हार्दिक पांड्या हसत मैदानात उतरतो. मात्र, लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केल्याने आता केविन पीटरसनने यावर मोठं वक्तव्य केलंय. 

सौरभ तळेकर | Updated: Apr 15, 2024, 05:11 PM IST
IPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोल title=
Kevin pietersen, Hardik Pandya

Hardik pandya hiding emotions : वानखेडेवरील पैसा वसूल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव (MI vs CSK) करत पलटणसमोरील आव्हानं अधिक खडतर केली आहेत. चार पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सचं प्लेऑफ गणित (Mumbai Indians Playoff Scenario) अधिक किचकट झालंय. मुंबईच्या पराभवाला हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी कारणीभूत असल्याचा आरोप मुंबईचे फॅन्स करत आहेत. तर हार्दिकच्या (Hardik pandya) वागणुकीवर देखील फॅन्स राग व्यक्त करत आहेत. हार्दिक पांड्या बिनकामी हसून पराभव जिरवतो, अशी चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता चेन्नईकडून स्विकारलेल्या पराभवानंतर आता इंग्लंडचा माजी कॅप्टन केविन पीटरसन याने (Kevin pietersen) मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला Kevin Pietersen ?

जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं की खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टी पांड्यावर परिणाम करत आहेत. जेव्हा पांड्या टॉससाठी मैदानात येतो, तेव्हा तो असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की, तो आनंदी आहे आणि खुश आहे. मात्र, खरं तर तो खूश नाहीये. मी पण याचा सामना केलाय. माझ्यासोबत देखील अशा गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे मला माहितीये की अशा गोष्टी नक्कीच परिणाम करतात, असं केविन पीटरसन म्हणाला आहे.

आपण सामन्यावेळी जी हुंटिग ऐकली, ती पांड्यासाठीच होती. जेव्हा महेंद्रसिंग धोनीने हार्दिकला सलग तीन सिक्स मारले, तेव्हा मुंबईची पब्लिक खुश होती. अशा गोष्टीने तुम्हाला दु:ख होतं. कारण खेळणाऱ्या खेळाडूमध्ये भावना असतात. हार्दिक पांड्या एक भारतीय खेळाडू आहे आणि तो त्याच्यासोबत असा व्यवहार करणं योग्य नाही, तेव्हा त्याचा परिणाम होतो आणि त्याचा क्रिकेटवर देखील परिणाम होत आहे, असंही केविन पीटरसनने म्हटलं आहे. 

दरम्यान,  मुंबई इंडियन्सला आणखी 8 सामने खेळायचे आहेत. त्यात राजस्थान रॉयल्ससोबत एक आणि कोलकाता विरुद्ध 2 सामने असतील. त्यामुळे तीन सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवणं थोडं अवघड दिसतंय. त्यामुळे उर्वरित, पंबाजविरुद्ध सामना, दिल्ली आणि लखनऊविरुद्धच्या दोन्ही सामन्यात मुंबईला विजय मिळवला लागेल.

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन (WK), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वधेरा, हार्विक देसाई, पियुष चावला, क्वेना मफाका, शम्स मुलानी, ल्यूक वुड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, नुवान तुषारा, अंशुल कंबोज.