कोलकाता-दिल्ली मॅचमध्ये दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल नेमकी कोण?

काव्या मारनपेक्षाही याच मिस्ट्री गर्लची सगळीकडे चर्चा, तुम्हाला हिचं नाव माहितीये का?

Updated: Apr 11, 2022, 10:43 AM IST
कोलकाता-दिल्ली मॅचमध्ये दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल नेमकी कोण? title=

मुंबई : कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्यात दिसलेल्या त्या मिस्ट्री गर्लचं अखेर सत्य समोर आलं आहे. मॅच दरम्यान या मिस्ट्री गर्लवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. लोक मॅच पाहायची सोडून तिलाच पाहात होते. ती सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाली होती. 

या मिस्ट्री गर्लच्या सौंदर्याचं कौतुक सगळेजण करत आहे. ह्या सुंदर तरुणीचं नाव आरती बेदी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र झी 24 तासने याची कोणतीही पुष्टी अद्याप केलेली नाही. सोशल मीडियावर तिचं नाव आरती असल्याची चर्चा आहे. आरती बेदी या नावावर तिचे सोशल मीडियावर काही फोटोही समोर आले आहेत. 

ही मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टिव्ह असते. कोलकाता विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात कॅमेरामनची नजर या मिस्ट्री गर्लवर पडली. त्याने या तरुणीच्या दिशेनं कॅमेरा फिरवला. कॅमेऱ्यामनच्या या कृतीमुळे त्याला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं. 

काव्या मारनसोबत सध्या या सौंदर्यवतीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. युजर्सनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं. अनेक जण या मिस्ट्री गर्लबाबत अधिक जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहेत.