बॉलरने नव्हे तर रूग्णालयातील नर्सने केलं कॅप्टन कूल केनला क्लिन बोल्ड

कॅप्टन कूल केनचा नर्सवर जडला जीव, उपचारासाठी रुग्णालयात जाताच झाला घायाळ

Updated: Jun 20, 2021, 09:44 AM IST
बॉलरने नव्हे तर रूग्णालयातील नर्सने केलं   कॅप्टन कूल केनला क्लिन बोल्ड title=

मुंबई: कूल कॅप्टन केन विल्यमसनच्या फलंदाजीवर सर्व मुली फिदा आहेत. त्याची मैदानातील तुफान फलंदाजी सर्वांनीच पाहिली आहे. तो बॉलर्सचीही धुलाई करतो. अशा केन विल्यमसनची विकेट एका बॉलरनं नाही तर तरुणीनं काढली आणि त्याला क्लीन बोल्ड केलं. 

केन विल्यमसनचं आयुष्य मैदानात जेवढं साधसरळ आहे त्यापेक्षा कैक पटीनं रंजक त्याचं खासगी आयुष्य आहे मात्र त्यावर तो विशेष बोलत नाही किंवा त्याला ते जाहीर सोशल मीडियावर शेअर करायला विशेष आवडत नाही. केन विल्यमसनची लव्हस्टोरी एखाद्या वेब सीरिजपेक्षा कमी नाही. मी असं म्हणण्यामागे खास कारण आहे. 

केन विल्यमसन एकदा उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. तिथे त्याच्यावर उपचार करणाऱ्या नर्सला पाहिलं आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. केन तिच्या नजरेनं घायाळ झाला. केनला ती पहिल्याच भेटीत आवडली होती. पुढे त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि तीच प्रेमात बदलली. केनला तर ती पहिल्याच भेटीत आवडली होती. 

केन आणि सारा रहीम पुढे एकमेकांना डेट करू लागले. सारा पेशानं नर्स आहे. केन उपचारासाठी जेव्हा रुग्णालयात गेला तेव्हा तिथेच पहिल्यांदा सारा आणि केनची भेट झाली. मैत्री आणि नंतर प्रेम असा सुंदर प्रवास सुरू झाला. 

केननं साराशी लग्न केलं आणि 16 डिसेंबर 2020मध्ये सारानं गोंडस मुलीला जन्म दिला. केननं स्वत: ही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर करून दिली होती. सध्या केनच्या खांद्यावर न्यूझीलंडच्या संघाची जबाबदारी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संघाला जिंकवून देण्यासाठी कॅप्टन कूल केनचे प्रयत्न सुरू आहेत.