आगामी सिरीजपूर्वी टेस्ट टीमचा कर्णधार बदलला; 'या' धडाकेबाज गोलंदाजाकडे नेतृत्व

गुरुवारी सकाळीच क्रिकेट चाहत्यांना (Cricket Fans) एक धक्का बसेल अशी बातमी समोर आली. टीमच्या कर्णधाराने पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 15, 2022, 03:46 PM IST
आगामी सिरीजपूर्वी टेस्ट टीमचा कर्णधार बदलला; 'या' धडाकेबाज गोलंदाजाकडे नेतृत्व title=

Kane Williamson steps down New Zealand Test captain : गुरुवारी सकाळीच क्रिकेट चाहत्यांना (Cricket Fans) एक धक्का बसेल अशी बातमी समोर आली. न्यूझीलंडचा कर्धणार केन विलियम्सन याने कर्णधारपदावरून (Captaincy) पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून किवी टीमची धुरा केन विलियम्सनने (Kane Williamson) सांभाळली. मात्र आता त्याने या कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केनच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Kane Williamson ने न्यूझीलंड टीमच्या कर्णधारपदाचा दिला राजीनामा

न्यूझीलंड क्रिकेटने गुरुवारी या गोष्टीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, केन विलियम्सनने (Kane Williamson) ने टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनाम दिला आहे. केनच्या राजीनाम्यानंतर टेस्ट टीमच्या नेतृत्व अनुभवी गोलंदाज टीम साऊदी करणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. याशिवाय उपकर्णधार म्हणून टम लॅथम याची निवड करण्यात आली आहे.

वनडे आणि टी-20 मध्ये केन करणार नेतृत्व

दरम्यान लिमिटेड ओव्हरच्या सामन्यात म्हणजेच टी-20 आणि वनडे सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा ही केन विलियम्सनच सांभाळणार आहे. वर्कलोड कमी करण्यासाठी केनने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. टीम मॅनेजमेंटशी चर्चा करून केनने हा निर्णय घेतला आहे, तर साऊदी न्यूझीलंडच्या टेस्ट टीमचा 31 वा कर्णधार असेल.

पाकिस्तान दौऱ्यासाठी टीमची घोषणा

याच महिन्यात न्यूझीलंडच्या टीमला पाकिस्तानच्या दौऱ्यावर जायचं आहे. या दौऱ्यावर किवी टीमला 2 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे. यासोबत 3 सामन्यांची वनडे सिरीज देखील खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडने या सिरीजी घोषणा केलीये. या टेस्ट सिरीजसाठी ईश सोधीने तब्बल चार वर्षांनी टेस्ट टीममध्ये कमबॅक केलं आहे. 

ईश सोधी नोव्हेंबर 2018 मध्ये शेवटचा टेस्ट सामना खेळला होता. याशिवाय टीम साऊदी या सिरीजमध्ये टीमचे नेतृत्व करणार आहे, तर टॉम लॅथमच्या खांद्यावर उपकर्णधाराची धुरा असणार आहे.

पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंड टीम

टिम साउदी (कर्णधार), माइकल ब्रेसवेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), डेवोन कॉनवे, मॅट हेनरी, टॉम लाथम (उपकर्णधार), डेरेल मिचेल, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, इश सोढ़ी, ब्लेयर टिकनर, नील वैगनर, केन विलियमसन, विल यंग