ICC Men's Test Ranking: टेस्ट क्रिकेटला मिळाला नवा बादशाह, लॅब्युशेनची घसरगुंडी; ऋषभ पंतचा जलवा कायम!

ICC Test Player Ranking: जो रूट 887 रेटिंग गुणांसह जगातील नवा नंबर 1 कसोटी फलंदाज बनलाय. तर टीम इंडियासाठी देखील गुडन्यूज मिळाली आहे.

Updated: Jun 21, 2023, 04:20 PM IST
ICC Men's Test Ranking: टेस्ट क्रिकेटला मिळाला नवा बादशाह, लॅब्युशेनची घसरगुंडी; ऋषभ पंतचा जलवा कायम! title=
Joe Root Becomes Number 1 ICC Ranked Test Batsman

ICC Men’s Player Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) नुकतीच नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. सध्या सुरू असलेल्या अॅशेस सिरीजनंतर टेस्ट फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून नंबर 1 क्रमांकावर असलेल्या मार्नस लॅबुशेनची (Marnus Labuschagne) घसरगुंडी झाल्याचं दिसून येतंय. ताज्या क्रमवारीत मार्नस लॅबुशेनची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर इंग्लंडचा स्टार प्लेयर जो रूट (Joe Root) याची पहिल्या स्थानी वर्णी लागली आहे. जो रूट 887 रेटिंग गुणांसह जगातील नवा नंबर 1 कसोटी फलंदाज बनलाय. तर टीम इंडियासाठी देखील गुडन्यूज मिळाली आहे.

केन विल्यमसन (Kane Williamson) 883 रेटिंग गुणांसह आयसीसी क्रमवारीतील टॉप 10 यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड (Travis Head) 873 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. तर बाबर आझम (Babar Azam) पाचव्या स्थानी कायम आहे. त्याचबरोबर स्टिवन स्मिथच्या (Steve Smith) रॅकिंगमध्ये 4 स्टेप्सची घसरण झाली असून तो 6 व्या स्थानी घसरला आहे. तर उस्मान ख्वाजाचं 2 रॅकिंगची बढती मिळालीये. पहिल्या 10 रँकिंगमध्ये फक्त एका भारतीय फलंदाजाला स्थान मिळालंय.

ऋषभ पंतचा जलवा कायम

30 डिसेंबरला सकाळी ऋषभ पंत याचा (Rishabh Pant) कार अपघात झाला होता. त्यानंतर गेले 7 महिने तो क्रिकेटपासून पूर्णपणे लांब आहे. अशातच आयसीसी क्रमवारीत अव्वल 10 यादीत भारतीय खेळाडू म्हणून फक्त ऋषभ पंत कायम राहिला आहे. पंत 758 रेटिंग गुणांसह 10 व्या क्रमांकावर तळ ठोकून थांबलाय. तर विराटची रँकिंग कितवी? जाणून घेऊया...

विराटची टेस्ट रँकिंग कितवी?

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 2018 पासून फॉर्ममध्ये नव्हता. त्यामुळे अनेक टेस्ट सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती. अशातच 700 गुणांसह विराट कोहली 14 व्या स्थानी पोहोचला आहे. याआधी तो 13 व्या स्थानी होता, आता त्याची एका अंकाने घसरण झाल्याचं पहायला मिळतंय.

आणखी वाचा - Ashes 2023: LIVE सामन्यात भिडले रॉबिन्सन अन् ख्वाजा, नेमकं काय झालं? पाहा Video

दरम्यान, जो रूट (Joe Root) गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम फलंदाजी करत आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात जो रूटने शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची दैणा उडवली होती. त्याने पहिल्या डावात 118 आणि दुसऱ्या डावात 46 धावा केल्या. या सामन्यात त्याने 1 विकेटही घेतली.