IPL 2021 सस्पेंड झाल्यानंतर CSK संघातील 'या' खेळाडूच्या पत्नीवर का होतेय टीका?

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चार्टर विमानाने मालदीव येथे पाठवण्यात आले आहे. 

Updated: May 8, 2021, 11:02 PM IST
IPL 2021 सस्पेंड झाल्यानंतर CSK संघातील 'या' खेळाडूच्या पत्नीवर का होतेय टीका? title=

मुंबई: कोरोनामुळे IPL चे सामने स्थगित झाले आहेत. त्यानंतर प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याच्या सूचना बीसीसीआने दिल्या आहेत.  अशा परिस्थितीत परदेशातल्या खेळाडूंना त्यांच्या मायदेशी पोहोचवण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मालदीवमध्ये पाठवण्यात आलं आहे. कारण ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू प्रथम मालदीवला जातील. तिथे त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, आणि त्यानंतर खेळाडू त्यांच्या घरी जावू शकतात. 

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चार्टर विमानाने मालदीव येथे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे काही खेळडू इतरांच्या निशाण्यावर आले आहेत. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज जेसन जेसन बेहरनडॉर्फ देखील आहे. शिवाय जेसन बेहरनडॉर्फच्या पत्नी जुवेलवर देखील ऑनलाईन टीका होत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू  सध्या चर्चेत आहेत. 

ब्रिटिश वेबसाईट डेलीमेलनुसार, जेसन बेहरनडॉर्फच्या पत्नीला लोक मेसेज करत आहेत. 'जेसनला कोरोना झाला पाहिजे..' असे मेसेज करणारे लोक ऑस्ट्रेलियन असून ते भारतात अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन नागरिक त्यांचा राग ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर काढत आहेत. 

यावर जेसन बेहरनडॉर्फ म्हणला; 'आम्ही कोणत्याही प्रकारचे नियम तोडले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून विमान अथवा अन्य कसली मागणी केलेली नाही. सरकार जे सांगेल ते सर्व खेळाडू करण्यासाठी तयार आहेत. शिवाय रांगेत बसून प्रतीक्षा करण्याची देखील आमची तयारी असल्याचं वक्तव्य जेसन बेहरनडॉर्फने केलं आहे.