IPL मधून माघार घेणं क्रिकेटपटूला पडलं भारी, मिळाली एवढी मोठी शिक्षा

आयपीएल सुरू होण्यापूर्वी गुजरात संघाला एक मोठा धक्का, क्रिकेट क्षेत्रातील सर्वात धक्कादायक बातमी बडा खेळाडू बॅन

Updated: Mar 23, 2022, 10:19 AM IST
IPL मधून माघार घेणं क्रिकेटपटूला पडलं भारी, मिळाली एवढी मोठी शिक्षा title=

मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगामा सुरू होत आहे. 26 मार्च रोजी पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता खेळवला जाणार आहे. जगातील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. बड्या बड्या खेळाडूंवर जास्त पैसा लागतो तर दुसरीकडे नव्या खेळाडूंना इथे संधी मिळत असते. आयपीएल सुरू होण्यापूर्वी गुजरात संघाला एक मोठा धक्का बसला. 

गुजरात संघातील स्टार खेळाडूनं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणं क्रिकेटपटूला चांगलंच महागात पडलं आहे. याची मोठा शिक्षा त्याला मिळाली. बायो बबलचं कारण देऊन या खेळाडूनं आयपीएलमधून माघार घेतली. मात्र त्याची हीच गोष्ट त्याला एवढी महागात पडू शकते असं त्याला कधीच वाटलं नसावं. 

IPL सोडण्यामुळे एवढं मोठं नुकसान
गुजरात संघातून इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसन रॉयने माघार घेतली. त्याला गुजरात संघाने 2 कोटी रुपये देऊन संघात घेतलं होतं. जेसन रॉयने माघार घेतल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डनेही त्याला शिक्षा दिली आहे. रॉयला 2 हजार 500 पाऊंडचा दंड ठोठवला आहे. शिवाय दोन सामन्यांसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

1 वर्षांपर्यंत लागू शकते बंदी
जेसनच्या वागणुकीमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डनं ही कारवाई केली. शिस्तभंग केल्यानं जेसनविरोधात हा निर्णय घेण्यात आला. 
 ईसीबीने याबाबत एक निवेदन जाहीर केलं. या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार 'शिस्तपालन समितीने जेसन रॉयच्या विरोधात निर्णय दिला. 

जेसनने त्याच्यावरील आरोप मान्य केले. जेसनच्या अशा वागण्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डचं नाव खराब होतं. त्याने 3.3 नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्याला 2 सामन्यातून निलंबित करण्यात आलं आहे. या निलंबनाचा कालावधी 12 महिन्यांपर्यंत वाढू देखील शकतो. आता हे जेसनच्या वागण्यावर अवलंबून आहे. 

दुसऱ्यादा जेसन IPL मधून बाहेर 
2020मध्ये आयपीएलमधून काही खासगी कारणांमुळे जेसन रॉय संघातून बाहेर पडला होता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाने 1.5 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतलं होतं. पुन्हा एकदा 2022 च्या आयपीएलपूर्वी जेसननं तीच चूक केली आहे. बायो बबलचं कारण देऊन आयपीएलमधून माघार घेतली.