IPL Auction 2021: 'हा' ठरला IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू

लिलावादरम्यान चर्चा झाली ती आणखीन एका खेळाडूची. या खेळाडूवर 9.25 कोटींची बोली लावण्यात आली होती. 

Updated: Feb 19, 2021, 04:19 PM IST
IPL Auction 2021: 'हा' ठरला IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू title=

चेन्नई: आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी चेन्नई इथे शुक्रवारी लिलाव झाला. या लिलावादरम्यान 16.25 कोटींची बोली लागली. IPLच्या इतिहासातील सर्वाधिक बोली ख्रिस मॉरिसवर लागली. ख्रिस मॉरिसने 16.25 कोटी घेत RCB संघात प्रवेश केला. या लिलावादरम्यान चर्चा झाली ती आणखीन एका खेळाडूची. या खेळाडूवर 9.25 कोटींची बोली लावण्यात आली होती. 

9.25 कोटींची बोली लावत कृष्णप्पा गौतमला चेन्नई सुपरकिंग्सनं आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं आहे. गौतम केवळ उत्तम गोलंदाजच नाही तर फलंदाजीतही तरबेज आहे. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. IPLमध्ये आतापर्यंत अनकॅप्ड खेळाडूला लागलेल्या बोलीत गौतम सर्वात अग्रस्थानी आहे. गौतमवर अनकॅप्ड असूनही जास्त बोली यंदाच्या आयपीएलमध्ये लावण्यात आली होती. 

सुरुवातीला केकेआरने गौतमवर 1 कोटींची बोली लावली होती. हैदराबादनं केकेआरपेक्षा जास्त बोली लावली आहे. कृष्णप्पावर 5 कोटींपर्यंत बोली लावण्यात आली. दोघांच्या या चढाओढीत चेन्नई सुपर किंग्सने उडी मारली आणि 9.25 कोटींची बोली लावून कृष्णप्पाला आपल्या संघात घेतलं.

अनकॉप्डचा विचार करता क्रुणाल पंड्यावर 2018 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 8.80 ची बोली लागली होती. त्याचा रेकॉर्ड तोडत गौतमवर आता 9 कोटींहून अधिक बोली लागली आहे. कृष्णप्पावर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात नेट गोलंदाज म्हणून कामगिरी सोपवण्यात आली होती. तर मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने गोलंदाजीमध्ये आपली चमकदार कामगिरी केली होती. 

कृष्णप्पा गौतमचा रेकॉर्ड
स्पिनर गोलंदाज गौतमने 62 टी-20 सामन्यांमध्ये 41 विकेट्स स्वत:च्या नावावर करून घेतले आहेत. 594 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक 28 व्या चेंडूवर त्याला विकेट काढण्यात यश आलं आहे. 

Tags: