विराट कोहलीला स्टाईलमध्ये टक्कर देतोय वीरेंद्र सेहवागचा भाचा

यंदा IPLचं 11 वे पर्व रंगणार आहे. नुकतीच आयपीएलसाठी खेळाडूंवर लागणारी बोली पूर्ण झाली आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 29, 2018, 09:37 AM IST
विराट कोहलीला स्टाईलमध्ये टक्कर देतोय वीरेंद्र सेहवागचा भाचा  title=

मुंबई : यंदा IPLचं 11 वे पर्व रंगणार आहे. नुकतीच आयपीएलसाठी खेळाडूंवर लागणारी बोली पूर्ण झाली आहे. 

राजस्थान रॉयल्सकडे महागडे खेळाडू 

भारताचा वेगवाग गोलंदाज जयदेव उनादकट हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने 11.5 कोटींना त्याला विकत घेतले. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स
हा यंदाच्या पर्वातही सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. 12.5 कोटींना राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले.  

किंग्स 11 पंजाबच्या अनेक बोली  आश्चर्यकारक  

क्रिस गेल या धडाकेबाज खेळाडूवर पहिल्या दोन टप्प्यांमध्ये बोलीच लागली नाही. मात्र किंग्स 11 पंजाबच्या खास मागणीवर तिसर्‍या  टप्प्यात प्रिती झिंटाने त्याला विकत घेतले. या निर्णयावर तेथील अनेकांनी जोरदार टाळ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.  

किंग्स इलेव्हन पंजाबच्या एका खास खेळाडूच्या खरेदीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. स्टाईल आणि लूक्समध्ये या खेळाडूची तुलना विराट कोहलीसोबत केली जात आहे.  

 

 

Viratkohli foundation# event# dinner# team

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on

 

कोण हा खेळाडू ? 

मयंक डागर हा हिमाचल प्रदेशातून खेळणारा क्रिकेटर, किंग्स 11 पंजाबने विकत घेतला आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याचं नाव फार नावारूपाला आलं नसलं तरीही लुक्स, स्टाईल आणि फीटनेसच्या बाबतीत मयंक विराटला तगडी स्पर्धा देतो. पंजाबच्या टीमने त्याला 20 लाखांमध्ये विकत घेतले आहे. 

मयंक डागर हा स्पिन गोलंदाज आहे. सोबत तो फलंदाजीही उत्तम करतो. 21 वर्षीय मयंक वर्ल्ड कप 2016 साली पहिल्यांदा चर्चेत आला होता. 
फीटनेस फ्रीक मयंकचे इंस्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग आहेत. 

वीरेंद्र सेहवागचा भाचा 

मयंक डागर हा वीरेंद्र सेहवागच्या कुटुंबाचा एक भाग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मयंक सेहवागचा भाचा आहे. मयंकची आई आणि वीरेंद्र सेहवाग हे दूरच्या नात्याने बहीण भाऊ आहेत. 

 

Done for the day!! 

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on

 

मुलींमध्ये क्रेझ  

 

 

Love for tattoos good enough  # Bangalore 

A post shared by mayankdagar (@mayank.dagar) on

 मयंकच्या लूक्सवर अनेक मुली  फिदा आहेत. अनेकींनी त्याच्या बॉडीची तुलना अभिनेता वरूण धवनशी केली आहे. हा खुलासा मयंकने एका मुलाखतीमध्ये केला होता.