IPL 2024 Retention : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' RCB ला जिंकवणार पहिली आयपीएल, ऑक्शनपूर्वी विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक!

Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आरसीबीला यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची (Mayank Dagar) मदत होणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Nov 26, 2023, 03:52 PM IST
IPL 2024 Retention : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' RCB ला जिंकवणार पहिली आयपीएल, ऑक्शनपूर्वी विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक! title=
IPL 2024, Royal Challengers Bangalore

Mayank Dagar In RCB for IPL 2024 : आयपीएल लिलावापूर्वी (IPL 2024 Auction) ट्रेड विंडो बंद होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहेत. आयपीएलमधील (IPL 2024) संघांना ज्या खेळाडूची गरज आहे, त्यासाठी एक्सचेंज ऑफर आता संपत आलीये. अशातच आता कोणत्या खेळाडूंना संघात ठेवणार आणि कोणत्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार? याची माहिती आला समोर येणार आहे. अशातच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) लिलावापूर्वी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आरसीबीला यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची (Mayank Dagar) मदत होणार आहे.

शाहबाज अहमदला (Shahbaz Ahamad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरकडून  (RCB) सनरायझर्स हैदराबादमध्ये (SRH) तर मयंक डागरला यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी इंडियन प्रीमियर लीग ट्रेडिंग विंडोमधून हैदराबादकडून आरसीबीमध्ये ट्रेड केल्याची माहिती आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटकडून देण्यात आली आहे. रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, शाहबाजला त्याच्या सध्याच्या किंमतीनुसार सनरायझर्सशी जोडण्यात आलं आहे. तर मयंक डागर त्याच्या सध्याच्या किमतीनुसार आरसीबीमध्ये सामील होईल. त्यामुळे आता आरसीबीकडे आणखी एक ऑलराऊंडर असणार आहे.

Mayank Dagar आहे कोण?

मयंक डागर (Mayank Dagar) हा भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा (Virender Sehwag) भावा आहे. आता तो विराट कोहलीच्या आरसीबीच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. कोहलीप्रमाणेच मयंकही त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो. तुम्हाला माहिती असेल तर विराट कोहलीला यो-यो टेस्टमध्ये हरवाणारा देखील मयंक डागर आहे. मयंकने आतापर्यंत 34 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या नावावर 97 विकेट आणि 801 धावा आहेत. मयांकने 2016 मध्ये भारताच्या अंडर-19 संघाचंही प्रतिनिधित्व केलं आहे. त्यावेळी अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला पण या सामन्यात मयांकने भेदक गोलंदाजी करताना 28 धावा देऊन तीन बळी टिपले होते.

दरम्यान, मागील आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL 2024 retention) सनरायझर्स हैदराबाद संघाने मयंक डागरला 1.80 कोटी रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केलं होतं, तर त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे. शाहबाजने आयपीएलमध्ये आतापर्यंत 39 सामने खेळले आहेत आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये सात धावांत तीन विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.