IPL 2024 : आयपीएलच्या सहाव्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Rohal Challengers Bangluru) यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. चुरशीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा (PBKS) पराभव केला. पहिली फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 6 विकेट गमावत 176 धावा केल्या. याला उत्तर देताना बंळुरुने विराट कोहली आणि दिनेश कार्तिकच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. पण या सामन्या दरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
काय घडलं सामन्यादरम्यान?
आरसीबी आणि पंजाब किंग्सच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या एका चाहत्याला (Virat Kohli Fans) सुरक्षा रक्षकांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याची चूक इतकीच होती की तो विराट कोहलीच्या पाया पडला. या घटनेचा हादरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.
आयपीएल 2024 च्या सहाव्या सामन्यात विराट कोहलीने तुफान फटकेबाजी केली. विराटने 49 चेंडूत 77 धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला शानदार विजय मिळवून दिला. विराट कोहली फलंदाजी करत असताना स्टेडिअममधून विराटचा एक चाहता सुरक्षा रक्षकांचं कडं तोडून थेट मैदानात घुसला. विराट कोहलीच्या दिशेने त्याने धाव घेतली, विराटच्या जवळ जाताच तो मैदानावर खाली बसत विराटच्या पाया पडला. पण या कृत्याची त्याला चांगलीच किंमत मोजावी लागली.
चाहत्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
विराट कोहलीच्या पाया पडताना सुरक्षा रक्षकांनी त्या चाहत्याला पकडलं आणि त्याला मैदातून बाहेर नेलं. पण इथवरच ते थांबले नाहीत. सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला स्टेडिअमच्या एन्ट्रीजवळ नेत लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. पाच ते सहा लोकं त्या तरुणावर तुटून पडले होते. स्टेडिअममधल्या एका जागृक प्रेक्षकांना ही मारहाण आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.आता मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
What kind of behavior is this chapri @RCBTweets
You don't have the right to touch anyone. Then what's the use of Law?
You can keep him in Jail/ Fine but you're attacking him in the stadium itself
Remember once VK leaves, even don't care about you @RCBTweets pic.twitter.com/vcb7tUngGQ
— Praneeth (@fantasy_d11) March 27, 2024
चुकीची इतकी भयानक शिक्षा?
सुरक्षा रक्षकांचं कडं तोडून मैदानावर घुसणं ही चूक आहे. या चुकीचं कोणीच समर्थन करत नाही. मैदानावर असं अचानक घुसल्याने खेळाडूंच्या जिवालाही धोका असू शकतो. याला सुरक्षा रक्षकांचा बेजबाबदारपणाही तितकाच कारणीभूत आहे. पण विराट कोहलीच्या पाया पडणाऱ्या तरुणाचा उद्देश केवळ विराटला भेटण्याचं होतं, मैदानावर घुसून अशाप्रकारे विराटला भेटणं ही चूक असली तरी या चुकीची इतकी भयाणक शिक्षा कितपत योग्य आहे, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे.