IPL 2024 च्या Auction ची तारीख ठरली! 'या' खेळाडूंना लागणार लॉटरी; जाणून घ्या खेळाडूंची बेस प्राईज

IPL 2024 Auction Date and Venue : यंदाच्या आयपीएल लिलावाची तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे घोषित करण्यात आलं आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 3, 2023, 04:06 PM IST
IPL 2024 च्या Auction ची तारीख ठरली! 'या' खेळाडूंना लागणार लॉटरी; जाणून घ्या खेळाडूंची बेस प्राईज title=
IPL 2024 Auction Date and Venue

IPL 2024 Auction : सर्वांना उत्सुकता असलेल्या यंदाच्या आयपीएल लिलावाची तारीख अधिकृतपणे घोषित करण्यात आलं आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला (IPL 2024 Auction Date) होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा परदेशी म्हणजेच दुबईमध्ये (IPL 2024 Auction Venue) होणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या याची माहिती जाहीर केली आहे. या लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी नोंदणी केली असून सर्व संघ 77 खेळाडूंवर एकूण 262.95 कोटी रुपये खर्च करतील.

पाहा खेळाडूंची बेस प्राईज

2 कोटी बेस प्राईज: हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजुर रहमान, टॉम बेंटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, जेराल्ड कोएत्झी, रिले रॉसो, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, अँजेलो मॅथ्यूज.

1.5 कोटी बेस प्राईज: मोहम्मद नबी, मॉइसेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरेल, टॉम करन, मार्चंट डी लॅंगे, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, टीम साऊथी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड.

1 कोटी बेस प्राईज: अॅश्टन आगर, रिले मेरीडिथ, डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, गस ऍटकिन्सन, सॅम बिलिंग्स, मायकेल ब्रेसवेल, मार्टिन गुप्टिल, काइल जेम्सन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल, डेव्हिड विसे.

आणखी वाचा - WPL 2024 Auction : लिलावासाठी 165 खेळाडू रिंगणार, कोण मारणार बाजी? पाहा फायनल लिस्ट!

दरम्यान, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रचिन रविंद्रची बेस प्राईज फक्त 50 लाख रुपये आहे. त्यामुळे रचिनवर मोठी बोली (IPL 2024 Auction) लागण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा नवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी अन् रॅसी व्हॅन डर डुसेन यांच्या लिलावावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. तर वानिंदू हसरंगा याला पुन्हा लॉटरी लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.