यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले 'चार चाँद', तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?

आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत  सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.  

Updated: May 19, 2022, 05:24 PM IST
यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले 'चार चाँद', तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता? title=

मुंबई: आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत  सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.  

उमरान मलिक
काश्मीरचा युवा फास्ट बॉलर उमराननं आताच 5 वर्षांपूर्वीचा आयपीएलमधील जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड मोडला. उमराननं 13 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. काश्मीरचा युवा गोलंदाज उमरान (Umran Malik) सध्या त्याच्या बॉलिंगमध्ये चर्चेत आला.

उमरानचा वेग 152Kmph च्या वर आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने 8 सामन्यात 15 विकेट घेतले आहेत. पर्पल कॅपच्या स्पर्धेत तो युजवेंद्र चहल नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. भारताकडे इतक्या वेगाने बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांची संख्या खूपच कमी आहे.

टिळक वर्मा
मुंबई टीमची कामगिरी खराब असली तरी टिळक वर्मा नेहमी चर्चेत राहिला नाही. मुंबईकडून टिळक वर्मा सध्या खेळत आहे. टीमची कामगिरी निराशाजनक असली तरी तो उत्तम खेळताना दिसत आहे. 13 सामन्यांमध्ये त्याने 376 धावा केल्या. 

मोहसिन 
मोहसिननेही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. लखनऊ मोहसिनने 8 सामन्यात 10 विकरेट्स घेतल्या आहेत. 

अर्शदीप
अर्शदीप पंजाबकडून डेथ ओव्हरमध्ये उत्तम बॉलिंग करतो. त्याने 13 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. तो डेथ ओव्हरमध्ये उत्तम बॉलिंग करतो. त्याचा फायदा पंजाबला झाला आहे. 

कुलदीप सेनी आणि अनुज रावत दोन्ही युवा खेळाडू आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांचंही नाव गाजलं आहे. यंदाच्या हंगामात जुन्या खेळाडूंच्या तुलनेत नव्या खेळाडूंनी अधिक चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे.