मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये अंपायरवरून अनेक वाद झाले. कधी नो बॉल न दिल्याने तर कधी आऊटवरून झाला. अंपायरचा निर्णय चुकीचा ठरला किंवा त्यावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानला 7 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.
जेव्हा श्रेयस अय्यर आऊट होता तेव्हा अंपायरने तो बॉल वाइड दिला. त्यावरून मैदानात वाद झाला आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं मात्र थर्ड अंपायरचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे सर्वजण हैराण झाले.
संजूला हे माहिती होतं की अंपायरचा निर्णय चुकला आहे. मात्र त्याने मैदानात कोणताही वाद न घालता थर्ड अंपायरचा निर्णय मागितला. रिव्हूदरम्यान श्रेयस अय्यर आऊट असल्याचं दिसलं आणि मैदानातील अंपायरचा निर्णय चुकीचा असल्याचं सिद्ध झालं.
DRS मुळे संजू सॅमसनला दिलासा मिळाला खरा पण राजस्थानला अखेर सामना गमावण्याची वेळ आली. ट्रेंट बोल्टने टाकलेला बॉल हा श्रेयस अय्यरच्या गलव्सला लागून गेल्याच दिसलं. त्यामुळे अंपायरचा निर्णय चुकीचा असल्याचं सिद्ध झालं.
रिंकू राणाने सामना फिरवला
कोलकाताकडून खूप चांगली कामगिरी रिंकू सिंहने केली. त्याने 23 बॉलमध्ये 42 धावा केल्या. रिंकू सिंहने एकहाती सामना फिरवला आणि त्यामुळे कोलकाताला विजय मिळाला. नीतीश राणानेही चांगली साथ दिली. त्याने 37 बॉलमध्ये 48 धावा केल्या.
संजू सॅमसनने संपूर्ण सामन्याची वाट लावली. तो अत्यंत धीम्या गतीने खेळत राहिल्याने टीमचं मोठं नुकसान झालं. त्याशिवाय इतर खेळाडू विशेष कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे राजस्थानला मोठा सेटबॅक बसला आहे.