RCB ला मिळाला नवा कर्णधार,आतातरी IPL जिंकणार? पाहा कॅप्टन म्हणून आतापर्यंतची आकडेवारी

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (ipl 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आरसीबीने (Rcb New Captain) त्यांच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. 

Updated: Mar 12, 2022, 08:12 PM IST
 RCB ला मिळाला नवा कर्णधार,आतातरी IPL जिंकणार? पाहा कॅप्टन म्हणून आतापर्यंतची आकडेवारी  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (ipl 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आरसीबीने (Rcb New Captain) त्यांच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. आरबीसीने विराट कोहलीनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा स्फोटक ओपनर फॅफ डु प्लेसिसला (Faf Du Plesis) नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. फॅफची आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कामगिरी कशी राहिली आहे, हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत. (ipl 2022 rcb new captain faf du plesis see her t20 captaincy record)

फॅफने आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नईचं प्रतिनिधित्व केलं आहे. फॅफने आयपीएलमध्ये अजून कॅप्टन्सी केलेली नाही. मात्र त्याने प्रदीर्घ काळ साऊथ आफ्रिकेचं आणि देशांतर्गत स्पर्धेत नेतृत्व केलं आहे.

फॅफची कॅप्टन म्हणून आकडेवारी?     
 
फॅफने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत देशांतर्गत स्पर्धेत 79 टी 20 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. यामध्ये त्याने 43 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर 34 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1 सामना हा टाय तर 1 अनिर्णित राहिला. 

आरसीबीचा सातवा कर्णधार 

दरम्यान फॅफ हा आरसीबीचा सातवा कर्णधार ठरला आहे. याआधी अनेक दिग्गजांनी आरसीबीचं नेतृत्व केलं आहे. मात्र या आधीच्या 6 जणांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकून देता आलेली नाही. त्यामुळे आता फॅफकडून बंगळुरुच्या चाहत्यांना अनेक अपेक्षा असणार आहेत. 

आरसीबीचे आतापर्यंतचे कर्णधार

विराट कोहली, अनिल कुंबळे, डेनिअर व्हिटोरी, राहुल द्रविड, केविन पीटरसन, शेन वॉटसन या 6 जणांनी आतापर्यंत आरसीबीचं नेतृत्व केलं आहे.