मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी क्रिकेट विश्वात परिचित आहे. विराटने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) आणि यपीएलमध्ये (IPL) बंगळुरुला (RCB) अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. मात्र त्याला आपल्या नेतृत्वात मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकून देता आलेलं नाही. विराटला आयपीएलमध्ये आरसीबीला ट्रॉफी जिंकून देता आली नाही. मात्र विराटचं हे अधुरं स्वप्न हे आरसीबीतील 3 खेळाडू पूर्ण करु शकतात. हे तिघे खेळाडू कोण आहेत, याबाबत आपण जाणून घेऊयात. (ipl 2022 rcb faf du plesis harshal patel and wanindu hasranga can win maiden ipl title for banglore and complete virat kohli dream)
आक्रमक ओपनर
आरसीबीने या 15 व्या मोसमात आपल्या ताफ्यात आक्रमक ओपनर बॅट्समनचा समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये याआधी चेन्नईकडून खेळलेला फॅफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आरसीबीकडून खेळणार आहे. फॅफने याआधी चेन्नईला एकहाती सामने जिंकून दिले आहेत.
फॅफने 14 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या होत्या. त्यामुळे यावेळेस आरसीबीला फॅफकडून अशाच वादळी खेळीची अपेक्षा असणार आहे. तसेच फॅफला बंगळुरुच्या कर्णधारहपदाची जबाबदारी मिळू शकते.
हर्षल पटेल
आरसीबीने हर्षल पटेलला (Harshal Patel) रिलीज केलं होतं. मात्र त्याला मेगा ऑक्शमध्ये आपल्या ताफ्यात घेतलंच.
हर्षल एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला होता. तसेच त्याने मुंबई विरुद्ध हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता. हर्षलने गेल्या 14 व्या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
हर्षलला याच कामगिरीसाठी पर्पल कॅप देण्यात आली होती. हर्षलने सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या होत्या.
स्टार स्पिनर
आरसीबीने या वेळेस श्रीलंकेचा स्पिनर वानिंदु हसरंगाला (Wanindu Hasaranga) घेतलं आहे. आरसीबीने हसरंगाला 10 कोटी 75 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. वानिंदू घातक बॉलिंगसाठी ओळखला जातो. वानिंदू प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो. हसरंगाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेत सर्वांनाच भेदक बॉलिंगचा नमुना दिला होता.
त्यामुळे फॅफ डु प्लेसिस, हर्षल पटेल आणि वानिंदु हसरंगा ही तिकडी विराटला न जमलेला कारनामा करणार का, याकडे आरसीबी चाहत्यांचं लक्ष लागून आहे.