मुंबई : मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यानंतर पॉईंट टेबलचं समीकरण कसं आहे? कोण आहे प्लेऑफमध्ये जाण्याचा दावेदार आणि कोणत्या टीमचं नाव आघाडीवर आहे जाणून घेऊया.
मुंबईने 10 सामने खेळून 2 जिंकले तर 8 गमवले आहेत. मुंबई टीम शेवटून पहिल्या स्थानावर आहे. तर 9 व्या स्थानावर चेन्नई टीम आहे. 8 व्या स्थानावर कोलकाता टीम आहे.
पंजाब टीमने 10 पैकी 5 सामने जिंकले असून 7 व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि हैदराबाद टीमनेही 10 पैकी 5 सामने जिंकले आणि 5 गमवले आहेत. त्यामुळे या तिन्ही टीमचे पॉईंट्स सारखे आहेत.
बंगळुरू आणि राजस्थान टीम यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. बंगळुरूने 11 पैकी 6 सामने जिंकले तर राजस्थाननं 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दोन्ही नव्या टीम पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. गुजरात टीम 11 सामने खेळून त्यापैकी 8 जिंकले आहेत. तर मुंबई विरुद्ध आयपीएलमधील तिसरा सामना पराभूत झाले. तर दुसऱ्या स्थानावर लखनऊ आहे.
लखनऊ आणि गुजरात दोन्ही टीम यंदाच्या हंगामात खूप चांगलं खेळताना दिसत आहेत. दोन्ही टीमने जवळपास प्लेऑफमध्ये स्थान पक्क केलं आहे. या दोन टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.