IPL 2022 | हीच टीम यावेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकणार : सुनील गावसकर

या 15 व्या मोसमाला अवघे काही तास शिल्लक असताना 'लिटील मास्टर' सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी आयपीएलच्या 15 व्या हंगामात कोण चॅम्पियन ठरणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.

Updated: Mar 25, 2022, 03:49 PM IST
IPL 2022 | हीच टीम यावेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकणार : सुनील गावसकर   title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) उद्यापासून (26 मार्च) सुरुवात होतेय. या मोसमात एकूण 10 संघ असल्याने यंदा स्पर्धेचा थरार आणखी वाढणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रंगत पाहता येणार आहे. या 15 व्या मोसमाला अवघे काही तास शिल्लक असताना 'लिटील मास्टर' सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी आयपीएलच्या 15 व्या हंगामात कोण चॅम्पियन ठरणार याबाबत भविष्यवाणी केली आहे. गावसकरांनी विजेत्या संघाचं नाव सांगितलंय. (ipl 2022 littile master sunil gavskar prediction about winner team of 15th season delhi capitals rishabh pant)

अशी आहे भविष्यवाणी

या हंगामातील सलामीचा सामना हा कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या मोसमापासून गुजरात आणि लखनऊ असे  2 नवे संघ जोडले गेले आहेत. आधीच्या 8 पैकी 3 संघांना एकदाही  चॅम्पियन होता आलेलं नाहीये. या 3 संघांमध्ये दिल्ली, बंगळुरु आणि पंजाबचा समावेश आहे. आता गावसकर यांनी आता भविष्यवाणी केलंय. 

दिल्ली कॅपिट्ल्स आयपीएल 2022 ची ट्रॉफी जिंकू शकते. तसेच काही सामन्यात पंजाबही सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकते, पण ते विजयी दावेदार नाही, असं गावसकर यांनी स्पष्ट केलं.