IPL 2022, GT vs LSG : सुपरमॅन Shubaman Gill, हवेत झेपावत 'कॅच ऑफ द मॅच'

शुबमन गिलने (Shubhaman Gill) हवेत उडत असलेल्या बॉलवर नजर ठेवली. त्यानुसार शुबमनने उलट दिशेने धावत हवेत झेप घेत शानदार कॅच घेतला. 

Updated: Mar 28, 2022, 08:36 PM IST
IPL 2022, GT vs LSG : सुपरमॅन Shubaman Gill, हवेत झेपावत 'कॅच ऑफ द मॅच' title=

मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील चौथा सामना हा गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (lucknow supergiants) यांच्यात खेळवण्यात येत आहे. गुजरातने टॉस जिंकून लखनऊनला भाग पाडलं. बॅटिंगला आलेल्या लखनऊनची निराशाजनक सुरुवात झाली. आपल्या टीमच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर कॅप्टन शून्यावर आऊट झाला. (ipl 2022 4th match gt vs lsg shubman gill flyed in air and take catch of the tournament to evin lewis at wankhede stadium mumbai)  

कॅप्टन केएल राहुल (K L Rahul) गोल्डन डक झाला. केएल कॅच आऊट झाला. त्यानंतर लखनऊच्या 13 धावा असताना क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) 7 धावांवर आऊट झाला. 

लखनऊच्या पहिल्या 2 विकेट्सपेक्षा जास्त चर्चा झाली ती शुबमन गिलने (Shubaman Gill) घेतल्या अफलातून आणि शानदार कॅचची. शुबमनने घेतलेल्या या कॅचमुळे लखनऊला तिसरा धक्का बसला.

नक्की काय झालं? 

सामन्यातील चौथी ओव्हर वरुन एरॉन टाकायला आला. वरुणच्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर एव्हिन लेव्हीसने जोरदार फटका मारला. शुबमनने हवेत उडत असलेल्या बॉलवर नजर ठेवली. त्यानुसार शुबमनने उलट दिशेने धावत हवेत झेप घेत शानदार कॅच घेतला. शुबमनच्या या कॅचमुळे एव्हिनला 10 धावांवर माघारी परतावं लागलं.

गुजरातचे अकरा शिलेदार : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, मॅथ्यू वेड,  डेव्हिड मिलर,  विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्यून, वरुण एरॉन आणि मोहम्मद शमी. 

लखनऊ प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन),  क्विटंन डी कॉक, एविन लुईस,  मनीष पांडे, दीपक हुड्डा, क्रृणाल पंड्या, आयुष बडोनी,  रवी बिश्नोई,  आवेश खान,  दुष्मंता चमीरा आणि मोहसिन खान. 

शुबमन गिलचा अफलातून कॅच