मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामातील तिसरा सामना आज रंगणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर SRH विरुद्ध KKR अशी लढत होणार आहे. मागच्या मोसमातील पराभवाचा बदला घेण्यासाठी हैदराबाद संघ सज्ज झाला आहे. मागच्या मोसमात दोन वेळा KKR संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता याचा बदला आजच्या सामन्यात घेण्यासाठी हैदराबाद संघानं तगडी स्ट्रॅटजी तयार केली आहे.
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना रंगणार आहे. सर्वात लक्ष्यवेधी मुद्दा म्हणजे दोन्ही संघांचे कर्णधार विदेशी खेळाडू आहेत. SRH संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आहे. तर KKR संघाचं नेतृत्व इंग्लंडच्या इयोन मॉर्गनकडे आहे.
सनरायझर्स हैदराबद संघाचं बॅटिंग लाइनअप जबरदस्त आहे. त्याच सोबत गोलंदाजी देखील आक्रमक आणि उत्तम आहे. केन विलियम्सन, जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, केदार जाधव आणि ऋद्धिमान साहा जवळ सर्वात उत्तम अनुभव आहे. यावेळी या संघाला पहिला सामना जिंकण्यात यश मिळेल असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सनरायझर्स हैदराबाद
डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, ऋद्धिमान साहा/ अब्दुल समद, केदार जाधव/विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा
कोलकाता नाईट रायडर्स
इयोन मॉर्गन, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, आंद्रे रसेल/पॅट कमिन्स, शाकिब अल हसन, वरूण चक्रवर्ती/हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, कमलेश नागरकोटी