मुंबई: IPLध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा मुकाबला रंगणार आहे. सध्या बंगळुरू संघाची गाडी IPLच्या ट्रॅकवर सुसाट धावताना दिसत आहे. पहिले तीन सामने एकामागोमाग एक जिंकत आता विजयाचा चौकार मारण्यासाठी निघाली आहे.
सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे . तर राजस्थान रॉयल्स केवळ 1 मॅच जिंकून सातव्या स्थानी आहे. राजस्थानला गेल्या मॅचमध्ये चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
When every minute till 7:30 PM feels like hours, you know it's matchday
Just ask DDP #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/14mE4X4Fgy
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 22, 2021
Vivo #IPL2021 RCB vs RR
It's the Battle Royale at the Wankhede. An unbeaten RCB against an ever-promising RR. From battles to watch out for to head-to-head numbers, here’s all that you need to know before the all-important match tonight.#PlayBold #WeAreChallengers #RCBvRR pic.twitter.com/1zVv2amvda
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 22, 2021
Indiranagar to Wankhede, #HallaBol!#RoyalsFamily | #RCBvRR | @IamSanjuSamson pic.twitter.com/gla0ajoXXY
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2021
दुसरीकडे बंगळुरुनं कोलकात्याचा धुव्वा उडवला होता. बंगळुरुचं पारडं राजस्थासमोर जड मानलं जात आहे. बंगळुरुचे ए बी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल तुफान फॉर्मात आहेत. या दोघांना झटपट गुंडाळण्यासाठी राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला विशेष रणनीती आखावी लागेल.
बंगळुरुला रोखण्याचं मोठं आव्हान संजूच्या राजस्थानसमोर असणार आहे. राजस्थानला विजय मिळवायचा असेल तर बंगळुरुला कडवी झुंज द्यावी लागेल. आजची मॅच जिंकून विजयी चौकार मारण्याच्या इराद्यानं विराटसेना मैदानात उतरेल. तर बंगळुरुच्या विजयी घोडदौडीला लगाम घालण्याचा राजस्थनाचा मानस असेल. त्यामुळे आजची मॅच चुरशीची होईल अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे.
जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया आणि मुस्तफिजुर रहमान
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, काइल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल