IPL 2021: PBKSला मोठा दिलासा, के एल राहुलवर शस्त्रक्रिया यशस्वी, लवकरच संघात येण्याची शक्यता

डॉक्टर आणि पीबीकेएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 8 एक दिवस त्याला आरामाची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढची प्रकिया सुरू करण्यात येणार आहे. 

Updated: May 4, 2021, 09:12 AM IST
IPL 2021: PBKSला मोठा दिलासा, के एल राहुलवर शस्त्रक्रिया यशस्वी, लवकरच संघात येण्याची शक्यता title=

मुंबई: IPLमध्ये कोरोना शिरल्यानं सर्वजण टेन्शनमध्ये आहेत. चेन्नई, कोलकाता आणि मुंबई संघाची धाकधूक वाढली असतानाच आता पंजाब संघासाठी एक दिलासादायक बातमी येत आहे. पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुलवर मुंबईमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. सर्वजण तो लवकर बरा होऊन मैदानात परत यावा यासाठी प्रार्थना करत आहेत. 

1 मे रोजी के एल राहुलच्या पोटात दुखायला लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला अपेंडिक्सचा त्रास असल्याचं समोर आल्यानंतर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. राहुलला क्वारंटाइन होऊन त्यानंतरच बायो बबलमध्ये येता येणार आहे. तो लवकरच संघासोबत जॉइन होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. 

डॉक्टर आणि पीबीकेएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 8 एक दिवस त्याला आरामाची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढची प्रकिया सुरू करण्यात येणार आहे. 

राहुलच्या अनुपस्थितीमध्ये संघाची जबाबदारी मयंक अग्रवालच्या खांद्यावर तात्पुरती सोपवण्यात आली आहे. दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबचा पराभव झाला होता. एकट्या मयंकने त्यावेळी 99 धावांचा पल्ला गाठला होता मात्र शतक हुकलं होतं. 

मयंकला त्याच्या नेतृत्त्वात दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आणि रविवारी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबचा दिल्ली कॅपिटलने 7 गडी राखून पराभव केला.