IPL 2021: प्रिती झिंटाचं बल्ले बल्ले! PBKS टीममध्ये या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

IPL 2021: या धडाकेबाज खेळाडूच्या एन्ट्रीमुळे पंजाब किंग्सचं नशीब पालटेल?

Updated: Sep 11, 2021, 09:04 PM IST
IPL 2021: प्रिती झिंटाचं बल्ले बल्ले! PBKS टीममध्ये या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री title=

मुंबई: आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच एक वाईट बातमी समोर आली आहे. डेव्हिड मिलर आणि जॉनी बेअरस्टो यांनी IPL 2021 मधून माघार घेतली आहे. त्यानंतर आता एका धडाकेबाज खेळाडूला संधी देण्यात आली आहे. त्याच्या एन्ट्रीमुळे पंजाब संघाला अजून एक चांगला फलंदाज मिळाल्याची चर्चा आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामला शनिवारी डेव्हिड मलानच्या जागी पंजाब किंग्सने घेतलं आहे. पंजाब किंग्सने एका निवेदनात म्हटले आहे की, आयपीएल 2021 चे उर्वरित सामने सुरू होण्यापूर्वी संघाने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मार्करामला संघात समाविष्ट केलं. पंजाब संघ पॉइंट टेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या टप्प्यात आता पंजाब संघाला पहिल्या 3 मध्ये येण्याचं तगड आव्हान आहे. तर सुरुवातीलाच राजस्थान रॉयल्स संघासोबत सामना खेळायचा आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि पंजाब किंग्स संघाचा फलंदाज डेविड मलान यांनी काही कारणामुळे IPL मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. PBKSने आपल्या ट्वीटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे चाहतेही नाराज झाले आहेत. 

आयपीएल 2021 4 मे रोजी खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. उर्वरित 31 सामने आता सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होतील. ऑक्टोबरमध्ये त्याचा अंतिम सामना होईल. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत आणि अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळला जाऊ शकतो.

एडन मार्करामने 26 कसोटी सामने खेळून त्यामध्ये 1824 धावा केल्या आहेत. तर 34 टी 20 सामने खेळून 843 धावा केल्या आहेत. टी 20 13 सामने खेळून 405 धावा केल्या आहेत. त्यामुळे याची कामगिरी पंजाबच्या फलंदाजी फळीसाठी मोलाची ठरू शकते असा काहींनी विश्वास व्यक्त केला आहे. आता पंजाब संघ दुसऱ्या सत्रात पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर येण्यासाठी काय स्ट्रॅटजी आखणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.