मुंबई: नुकताच धोनीने केलेल्या स्लेजिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची चर्चा निवळत असतानाच आता कोलकाता विरुद्ध पंजाब झालेल्या सामन्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने एक कोडवर्ड सामन्यादरम्यान वापरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर अनेक तज्ज्ञ आणि सोशल मीडियावर कोलकाता संघावर टीका करत आहेत.
कोलकाता संघाने वापरलेल्या कोडवर्डवरून घमासान सुरू आहे. या इशारांवरून आता वीरेंद्र सेहवाग देखील संतापले आहेत.यावरून त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोलकाता विरुद्ध पंजाब झालेल्या सामन्यात कोलकाता संघातील एक खेळाडू बॉलिंग करत होता आणि पंजाबची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी डगआऊटमधून कोलकाता संघातील खेळाडूंनी 54 असा लिहिलेलं प्लेकार्ड दाखवलं. या 54 नंबरमागचं रहस्य काय आहे हे मात्र अद्याप उलगडू शकलं नाही.
— Cricket Unlimi (@CricketUnlimi) April 26, 2021
कोलकाता नाईट रायडर्सच्या या कृत्यावर टीम इंडियाचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग प्रचंड संतापले आहेत. सेहवाग म्हणाले की 'आपल्याकडे सैन्यात अशी कोड भाषा वापरली जात असल्याचं पाहिली आहे. माझ्या मते "54" हे त्याच्या योजनेचे एक नाव होतं. त्यावेळी कदाचित एखाद्या खास बॉलरकडे बॉलिंगची जबाबदारी सोपवायची असेल. अशा प्रकारे जर डगआऊटमधून निर्णय घेतले जात असतील तर कर्णधाराचं मैदानातील महत्त्व संपून जाईल'
अशा प्रकारे मागून मदत घेणं काही वाईट नाही मात्र कर्णधाराला कधी कोणत्या गोलंदाजाला कोणती जबाबदारी द्यायची याचं माहिती असायला हवी. जर कर्णधार एखादी गोष्ट विसरला असेल तर त्याला आठवण करून देण्यासाठी कोडवर्डचा वापर करायला काहीच समस्या नसते असंही सेहवान यांनी म्हटलं आहे.
या 54 क्रमांकाचा नेमका अर्थ काय होता? या मागे नेमकी काय स्ट्रॅटजी होती याचा खुलासा तरी अद्याप समोर आलेला नाही. पंजाब संघाला कोलकाताने 5 विकेट्सने पराभूत करत यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे.
त्यानुसार कदाचित त्या वेळी एखाद्या विशिष्ट गोलंदाजाबरोबर त्याच्या गोलंदाजीची इच्छा असू शकेल. मला हे समजले आहे की डगआऊटमधील व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांना कर्णधाराची काही मदत हवी होती.