IPL 2021: आपलीच विकेट काढणाऱ्या दिल्लीच्या बॉलरला विराट कोहलीनं दिलं गिफ्ट

विराट कोहली आणि ए बी डिव्हिलियर्सने या बॉलरला खास गिफ्ट दिलं आहे. 

Updated: Apr 28, 2021, 02:33 PM IST
IPL 2021: आपलीच विकेट काढणाऱ्या दिल्लीच्या बॉलरला विराट कोहलीनं दिलं गिफ्ट title=

मुंबई: बंगळुरू संघाने दिल्लीवर 1 रनने विजय मिळवला आहे. रोमांचक सामन्यानंतर विराट  कोहलीचा प्रेमळपणा चाहत्यांना पाहायला मिळाला. सामना संपल्यानंतर निराश झालेल्या ऋषभ पंतच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याला धीर देताना दिसला तर दुसरीकडे आपलीच विकेट काढणाऱ्या फॅन बॉय बॉलरला खास भेट देखील दिली आहे.

दिल्ली संघातील गोलंदाज आवेश खाननं बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीची ऑटोग्राफ आपल्या जर्सीवर घेतली आहे. इतकच नाही तर ए बी डिव्हिलियर्सची देखील ऑटोग्राफ त्यानं आपल्या जर्सीवर घेतली आहे. आवेश खाननं विराट कोहलीला आऊट करत तंबुत माघारी धाडलं होतं. विराट कोहलीनं दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 12 धावा तर ए बी डिव्हिलियर्सने 75 धावांची खेळी केली आहे. 

दिल्लीच्या आवेश खाननं याआधी फाफ ड्युप्लेसी, धोनी, बेअरस्टो, पुरन, यादव आणि आता विराट कोहलीची विकेट काढली आहे. त्याने केलेल्या कामगिरीचं कौतुकही होत आहे. 

फॅन बॉय आवेश खानला हिटमॅनकडून गिफ्ट

मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर आवेश खान याने मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माची ऑटोग्राफ आपल्या जर्सीवर घेतली आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आतापर्यंत चेन्नई विरुद्धचा सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. नुकत्याच झालेल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात तर अवघ्या 1 रनने विजय मिळाला आहे. पॉइंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिलं स्थान मिळवलं आहे.