IPL 2019: केएल राहुलचं शतक, मुंबईला विजयासाठी १९८ रनचं आव्हान

केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर पंजाबने मुंबईपुढे मोठ्या धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे. 

Updated: Apr 10, 2019, 10:01 PM IST
IPL 2019: केएल राहुलचं शतक, मुंबईला विजयासाठी १९८ रनचं आव्हान title=

मुंबई : केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर पंजाबने मुंबईपुढे मोठ्या धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने २० ओव्हरमध्ये १९७/४ एवढा स्कोअर केला आहे. केएल राहुलने ६४ बॉलमध्ये नाबाद १०० रनची खेळी केली आहे. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण पंजाबच्या दोन्ही ओपनरनी मुंबईच्या बॉलरचा अक्षरश: धुव्वा उडवला. राहुल आणि गेल यांच्यामध्ये ११६ रनची पार्टनरशीप झाली. क्रिस गेल ३६ बॉलमध्ये ६३ रन करून आऊट झाला.

क्रिस गेल आऊट झाल्यानंतर मुंबईच्या टीमने मॅचमध्ये पुनरागमन केलं. पण १९व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने २५ रन दिले. तर २०व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने १३ रन दिले. शेवटच्या ३ ओव्हरमध्ये पंजाबने ५४ रन काढले.

मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, पण त्याने ४ ओव्हरमध्ये तब्बल ५७ रन दिले. बेहरेनडॉर्फ आणि बुमराहने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. दुखापतीमुळे या मॅचमध्ये कर्णधार रोहित शर्मा खेळत नाहीये. रोहित शर्माऐवजी मुंबईने सिद्धेश लाडला संधी दिली आहे. रोहितऐवजी पोलार्डकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा