आंतरराष्ट्रीय बॉडिबिल्डर जगदीश लाड यांचं कोरोनाने निधन

उत्तम शरीरयष्टी असलेल्या दोन  शरीरसौष्ठवपटूंच निधन 

Updated: Apr 30, 2021, 02:57 PM IST
 आंतरराष्ट्रीय बॉडिबिल्डर जगदीश लाड यांचं कोरोनाने निधन title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बॉडिबिल्डर जगदीश लाड यांच आज वडोदरा येथे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. जगदीश लाड हे जगदीश लाड हे 34 वर्षांचे होते. (International bodybuilder Jagdish Lad dies in Corona) आपल्या बॉडिबिल्डींग करिअरमध्ये जगदीश यांनी भारत श्री खिताबही पटकावला होता.

जगदीश लाड हे काही वर्षांपूर्वीच नवी मुंबईहून वडोदरा येथे स्थायिक झाले. वडोदरा येथे त्यांनी बॉडीबिल्डींगची नवी सुरूवात केली. शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड हे मुळचे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा होते. नवी मुंबईहून लाड हे वडोदरा येथे स्थायिक झाले होते. वडोदरा येथे त्यांनी स्वतःची व्यायामशाळा सुरू केली आहे. 

कायम हसतमुख आणि उत्साही असलेले प्रेरणादायी  खेळाडूंचे अचानक निधन झाल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. World championship मध्ये लाड यांना सिल्व्हर मेडल मिळालं असून मिस्टर इंडियामध्ये गोल्ड मेडल मिळालं आहे. तसेच लाड यांना महाराष्ट्र श्रीमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं. नवी मुंबई मेयर श्री मध्ये लाड यांनी किताब पटकावला होता. जगदीश लाड यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं.  जवळपास 15 वर्ष व्यवसायिक खेळाडू म्हणून त्यांचं करिअर केलं आहे. जगदीश लाड ९० किलो वजनीगटात सहभागी होत असे. 

जगदीश लाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चार दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र कोरोनावर ते मात करू शकले नाहीत. जगदीश लाड यांना एक मुलगी असून ते तीन वर्षांपूर्वीच वडोदरा येथे स्थायिक झाले होते. तसेच कल्याण येथील एक उदयन्मुख आणि अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या शरीर संस्था पटू मनोज लाखन यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. मनोज लाखन हे 30 वर्षांचे असून रेल्वेत नोकरी करत होते. लाखन यांना कोरोनाची लागण झाल्यावर  व्हेंटीलेटर बेड न मिळाल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. मनोज लाखनला गॅलॅक्सी हॅास्पीटल मिरा रोड येथे ॲडमिट करण्यात आलं.