Glenn Maxwell Injury Update: IPLचा सिजन सुरु होण्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत T20 लीग IPL (IPL 2023) सुरु होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा धक्का बसला, जेव्हा संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा जखमी झाला होता. आता त्याच्या दुखापतीबद्दल एक अपडेट समोर आली आहे. ही अपडेट टीमसाठी उत्साह वाढवणारी आहे. आरसीबीचे संचालक (क्रिकेट ऑपरेशन्स) माईक हेसन यांनी मॅक्सवेल पुढील हंगामापूर्वी संघात सहभागी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर मॅक्सवेल 12 आठवड्यांपर्यंत मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. मॅक्सवेल याला मित्राच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान ही दुखापत झाली होती, त्यानंतर रविवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायला दुखापत झाली तेव्हाच तो त्याच्या मित्राच्या घरी होता. नंतर कळले की त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. (अधिक वाचा - Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा)
दुखापतग्रस्त अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामापूर्वी मैदानात परतणार असल्याचे आरसीबीचे संचालक माईक हेसन यांनी मॅक्सवेल यांनी म्हटले आहे. टीमने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हेसन म्हणाले, 'मॅक्सवेलबद्दल थोडी चिंता आहे, पाय मोडल्याने तो रिटेन्शनकडे (खेळाडूला संघात ठेवून) वाटचाल करत आहे. आम्ही त्याच्या लवकर बरे होण्याची आशा करतो. तो आयपीएलच्या खूप आधी संघात दाखल होईल. तो क्रिकेट मैदानावर दिसेल. समतोल राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा खेळाडू संघात असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
ग्लेन मॅक्सवेल गतवर्षी RCBटीममध्ये दाखल झाला होता. दिग्गज विराट कोहली गेली अनेक वर्षे या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मॅक्सवेल आयपीएलच्या (IPL-2021) 2021 च्या मोसमात चांगला खेळ केला होता. यानंतर फ्रँचायझीने त्याला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. मॅक्सवेलने गेल्या मोसमात (IPL-2022) 13 सामन्यांत एकूण 301 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचे टीममध्ये पुनरागम होणे खूप महत्वाचे ठरणार आहे. ग्लेन मॅक्सवेल याच्या चांगल्या खेळामुळे टीम अधिक मजबूत स्थितीत होईल. त्यामुळे विराट कोहली याच्या संघाला ते खूप फायदेशीर ठरेल.