टीम इंडियाला जोरदार झटका, हा खेळाडू वन-डे सीरिजमधून बाहेर

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात रविवारपासून तीन वन-डे मॅचेसची सीरिज सुरु होणार आहे. मात्र, या सीरिजपूर्वी टीम इंडियाला एक झटका लागला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 9, 2017, 10:08 PM IST
टीम इंडियाला जोरदार झटका, हा खेळाडू वन-डे सीरिजमधून बाहेर title=
File Photo

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात रविवारपासून तीन वन-डे मॅचेसची सीरिज सुरु होणार आहे. मात्र, या सीरिजपूर्वी टीम इंडियाला एक झटका लागला आहे.

टीम इंडियाला एक झटका

टीम इंडियाचा ऑलराऊंडर प्लेअर वन-डे सीरिजमधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे रविवारपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सीरिजला त्याला मुकावे लागणार आहे.

दुखापतीमुळे सीरिजमध्ये खेळू शकणार नाही

टीम इंडियाचा बॅट्समन केदार जाधव हा दुखापतीमुळे सीरिजमध्ये खेळू शकणार नाहीये. केदार जाधव ऐवजी तामिळनाडूच्या वॉशिंग्टन सुंदरची टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

शिखर धवनही टीममधून बाहेर

पीटीआयच्या माहितीनुसार, शिखर धवन आजारी पडल्याने त्याची पहिल्या वन-डे मॅचमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तीन वन-डे मॅचेसची सीरिज होणार आहे. पहिली मॅच धरमशाला येथे रविवारी खेळण्यात येणार आहे. ही मॅच सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. विराट कोहलीच्या अनुपस्थित टीमची धूरा रोहित शर्माकडे असणार आहे.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम एस धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल.

श्रीलंकन टीम: थिसारा परेरा (कॅप्टन), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, लाहिरू थिरिमाने, एंजेलो मैथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), चतुरंगा डि सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, नुआन प्रदीप, सदीरा समरविक्रमा, धनंजय डि सिल्वा, दुष्मंत चमीरा, सचित पाथिराना, कुशल परेरा.