INDvsSA टेस्ट सीरीज: टॉस जिंकत भारताचा पहिला फलंदाजीचा निर्णय

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आज तिसर्‍या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. पहिल्या दोन टेस्ट मॅच हरल्यानंतर भारत तिसर्‍या टेस्ट सीरीजमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. 

Updated: Jan 24, 2018, 01:38 PM IST
INDvsSA टेस्ट सीरीज:  टॉस जिंकत भारताचा पहिला फलंदाजीचा निर्णय  title=

दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आज तिसर्‍या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. पहिल्या दोन टेस्ट मॅच हरल्यानंतर भारत तिसर्‍या टेस्ट सीरीजमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. 

आजपासून सुरूवात  

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गमध्ये तिसरी टेस्ट सीरिज आजपासून सुरू होणार आहे. टॉस जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणे तर आर.अश्विनच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात  आली आहे. 

कसे असतील संघ 

 भारत : विराट कोहली ( कर्णधार ), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, पार्थिव पटेल.

दक्षिण अफ्रीका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), एबी डिविलियर्स,डीन एगर, एडेन मार्कराम, हाशिम अमला, क्विंटन डिकॉक, एंडेल फुलकवायो, मोर्नी मोर्कल, वेर्नोन फिलेंडर, कागिसो रबाडा, लुंगी एंगिडि.