भारतातील हे दिग्गज खेळाडू Dog Lovers, पाहा फोटो

भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांचे प्राणी प्रेम... श्वानांची नावं पण खूप इंटरेस्टिंग 

Updated: Mar 9, 2022, 12:27 PM IST
भारतातील हे दिग्गज खेळाडू Dog Lovers, पाहा फोटो  title=

मुंबई : भारतीय क्रिकेटर्सचं आपल्या लाडक्या Dog सोबतचं प्रेम लपलेलं नाही. धोनी ते अगदी सचिन आणि विराटपर्यंत सगळ्यांकडेच Dog आहेत. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांसोबतचे फोटो पोस्ट केलेत. 

भारतातील अनेक क्रिकेट खेळाडूंकडे पाळीव प्राणी आहेत. ते कायमच आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. 

विराट कोहली 

विराट कोहली

विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला देखील Dogs खूप आवडतात. अनुष्का आणि विराट आपल्या पाळीव प्राण्यासोबत वेळ घालवतात. त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. विराट आणि अनुष्का यांच्या पाळीव प्राण्याचं नाव आहे 'Dude' असं आहे. 

महेंद्र सिंह धोनी 

महेंद्र सिंह धोनी

भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी हा डॉग लवर आहे. रांचीमध्ये धोनीच्या फार्म हाऊसमध्ये खूप पाळीव कुत्रे आहेत. धोनीची पत्नी साक्षी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. एमएस धोनीकडे जर्मन शेफर्ड आणि वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आहेत. 

सचिन तेंडुलकर 

सचिन तेंदुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाळीव कुत्र्यावरच प्रेम कधीच लपवत नाही. सचिन कायमच आपल्या पॅट डॉग 'स्पाइक' सोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतो. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करते.

लोकेश राहुल 

लोकेश राहुल

टीम इंडियाचा स्टार ओपनर लोकेश राहुल हा देखील डॉग लव्हर आहे. त्याच्याकडे जो पाळीव कुत्रा आहे त्याचं नाव Simba आहे. सिम्बाची लोकप्रियता इतकी आहे की, त्याचं वेगळं इंस्टाग्राम अकाऊंट देखील आहे. सिम्बासोबतच लोकेशकडे अनेक ब्रीडचे कुत्रे आहेत.  

हार्दिक पांड्या 

हार्दिक पांड्या

भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या खूप डॉग लव्हर आहे. हार्दिक पांड्याच्या घरी अनेक कुत्रे आहेत. तो कायमच आपले फोटो शेअर करत असतो.