मुंबई : 26 जानेवारी 1950 रोजी (Republic Day) भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी मोठा विजय आहे. या दिवशी, टीम इंडियाचा विजयही लक्षात येतो. जेव्हा या खासप्रसंगी प्रथमच भारताने आपला एकदिवसीय सामना जिंकला होता.
26 जानेवारी 2019 रोजी न्यूझीलंडसमोर भारतीय संघाने मोठे आव्हान ठेवले होते. यापूर्वी या विशेष दिवशी भारताने कधीही विजय मिळविला नव्हता. पण 2019 मध्ये टीम इंडियाच्या वाघांनी संपूर्ण देशाला विजयाची भेट दिली.
या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत हा टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय होता. त्याचबरोबर, 26 जानेवारी रोजी झालेल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला विजय.
सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनची शतकी भागीदारी या सामन्यात फार महत्वाची ठरली. या दोन्ही खेळाडूंनी 154 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 87 धावा केल्या तर शिखर धवनने 66 आणि भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला 525 धावांचे लक्ष्य दिले.
प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर काही खास करू शकला नाही आणि 234 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली आणि 4 गडी बाद केले.
टीम इंडियाने 26 जानेवारी 1986 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात त्यांना 36 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर2000 मध्ये अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. यानंतर 2015 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला सामना व्यर्थ ठरला.
चौथ्यांदा संघ बदलला आणि भारताचे नशीबदेखील. न्यूझीलंडला हरवून 26 जानेवारीला टीम इंडियाने प्रथमच एकदिवसीय सामना जिंकला.