Video: भारताची भेदक बॉलिंग, दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया १९१/७

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलरनी जोरदार पुनरागमन केलं आहे.

Updated: Dec 7, 2018, 03:51 PM IST
Video: भारताची भेदक बॉलिंग, दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया १९१/७ title=

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलरनी जोरदार पुनरागमन केलं आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं ७ विकेट गमावून १९१ रन केले होते. दिवसाअखेर ट्रेव्हिस हेड ६१ रनवर नाबाद आणि मिचेल स्टार्क ८ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून आर.अश्विनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. अर्धशतक करणारा ट्रेव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे.

तत्पूर्वी २५०/९ अशी दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारताला एकही रन करता आली नाही. दिवसाच्या पहिल्याच बॉलला मोहम्मद शमी आऊट झाला. भारताचा डाव २५० रनवर आटोपल्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया अजूनही ५९ रननी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशीही अशाच प्रकारे भेदक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर ऑल आऊट करण्याचं आव्हान भारतीय टीमपुढे असणार आहे.

पाहा दुसऱ्या दिवसाच्या हायलाईट्स

भारताचा २५० रनवर ऑल आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाला ईशांत शर्मानं पहिल्याच ओव्हरला धक्का दिला. ईशांतनं तिसऱ्याच बॉलला एरॉन फिंचचा त्रिफळा उडवला. यानंतर ऑस्ट्रेलियाला एकामागोमाग एक धक्के बसतच गेले. ऑस्ट्रेलियाची एकावेळी अवस्था १२७-६ अशी झाली होती. पण ट्रॅव्हिस हेड आणि पॅट कमिन्स यांच्यामध्ये ५० रनची पार्टनरशीप झाली.