वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टॉस जिंकून भारताची बॅटिंग

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आहे.

Updated: Aug 11, 2019, 07:14 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टॉस जिंकून भारताची बॅटिंग title=

पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वनडेमध्ये खेळलेल्या खेळाडूंसोबतच भारत दुसऱ्या वनडेमध्ये मैदानात उतरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली वनडे पावसामुळे रद्द झाली होती. 

'दुसऱ्या इनिंगमध्ये ही खेळपट्टी संथ होऊ शकते आणि याचा फायदा स्पिनरना मिळू शकतो, म्हणून आम्ही पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला,' असं विराट कोहली म्हणाला. तर वेस्ट इंडिजने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला आहे. फॅबियन ऍलनला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी ओशेन थॉमसला संधी देण्यात आली आहे. क्रिस गेलची ही ३०० वी वनडे मॅच आहे. 'गेलसाठी ही महत्त्वाची मॅच आहे.  उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल मी गेलचं अभिनंदन करतो, गेलसाठी आम्हाला ही मॅच जिंकायची आहे,' अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने दिली. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

भारतीय टीम 

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद

वेस्ट इंडिजची टीम 

क्रिस गेल, एव्हिन लुईस, शाय होप, निकोलास पूरन, शिमरोन हेटमायर, रोस्टन चेस, जेसन होल्डर (कर्णधार), कार्लोस ब्रॅथवेट, केमार रोच, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस