दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेचा संघर्ष सुरु

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 3, 2017, 05:30 PM IST
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेचा संघर्ष सुरु title=

नवी दिल्ली : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. 

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला जाणार सामना आज प्रदूषणामुळे रंगला. प्रदूषणामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला. काही काळ खेळ थांबला पण त्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला.

दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या 3 बाद 131 धावा झाल्या. अँजेलो मॅथ्यूज 57 आणि कर्णधार दिनेश चांडमल 25 धावांवर खेळतो आहे. टीम इंडियासाठी शमी, ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

दिलरुवान परेराच्या रूपात श्रीलंकेला तिसरा धक्का बसला. जडेजाने त्याला माघारी पाठवलं. ईशांतने धनंजय डी. सिल्वा १ रनवर आऊट करत श्रीलंकेला 14 रनवर दुसरा धक्का दिला. तर करूणात्नेला ० रनवर आऊट करत शमीने पहिल्याच बॉलला श्रीलंकेला पहिला झटका दिला.

536 रनवर कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित केला. भारतीय संघाने रोहित शर्मा (65), रवीचंद्रन अश्विन (4) आणि विराट कोहली (243) यांच्या रुपात दुसऱ्या दिवशी विकेट गमावल्या. रिद्धामन साहा 9 आणि रवींद्र जडेजा 5 धावांवर नाबाद राहिले.