विराटच्या दुहेरी शतकाप्रमाणेच रोहित शर्माचे हे 'दोन' शॉर्ट्स ठरले खास

भारत - श्रीलंकेदरम्यान तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू आहे. रविवारी या सामन्यामध्ये एक 'ड्रामा' रंगला.  दिल्लीतील स्मॉगच्या समस्येमुळे श्रीलंकन खेळाडूंनी हा सामना अनेकदा थांबवला.  

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 4, 2017, 05:53 PM IST
विराटच्या दुहेरी शतकाप्रमाणेच रोहित शर्माचे हे 'दोन' शॉर्ट्स ठरले खास  title=

दिल्ली : भारत - श्रीलंकेदरम्यान तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू आहे. रविवारी या सामन्यामध्ये एक 'ड्रामा' रंगला.  दिल्लीतील स्मॉगच्या समस्येमुळे श्रीलंकन खेळाडूंनी हा सामना अनेकदा थांबवला.  

वारंवार श्रीलंकन खेळाडू खेळामध्ये व्यत्यय आणत असल्याने  अखेर विराटकोहलीनेदेखील भारताचा   पहिला डाव ७ विकेट ५३६ धावांवर घोषित केला. 

विराट कोहलीचा दमदार खेळ  

विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीप्रमाणेच रोहित शर्मादेखील उत्तम खेळला. विराट कोहली हा असा पहिला कॅप्टन ठरला आहे की ज्याने टेस्ट मॅचमध्ये सहा दुहेरी शतकं झळकवली आहेत. एकीकडे विराटची तुफान खेळी सुरू होती तर दुसरीकडे रोहित शर्मादेखील शांत स्वरूपात खेळत होता.  

विराटला रोहितची साथ  

विरात कोहलीसोबत केवळ तो शांतपणे साथ देत नव्हता तर सोबतच काही बघण्यासारखे शॉर्ट्स मारत होता. 

रोहितने १०२ बॉल्समध्ये ६५ धावा बनवल्या . ११८ व्या ओव्हरमध्ये संदाकनच्या बॉलवर तो आऊट झाला. 

भारत मजबूत स्थितीत  

विराट कोहलीचे दुहेरी शतक सोबत मुरली विजयच्या १५५ आणि रोहित शर्माच्या ६५ धावा याच्या जोरावर भारतीय संघा ने ५०० धावांचा टप्पा पार केला.