पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या दिवशी भारताने ६०१/५ या स्कोअरवर पहिला डाव घोषित केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३६/३ अशी झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरना दुसऱ्या दिवशी विकेटसाठी संघर्ष करावा लागला. विकेट मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एकमेकांशी मैदानातच पंगा घेतला.
१२३व्या ओव्हरमध्ये कगिसो रबाडाने बॉल विकेट कीपर क्विंटन डिकॉकच्या दिशेने फेकला. डिकॉकला हा बॉल पकडता न आल्यामुळे भारताला जास्तीची एक रन मिळाली. डिकॉकच्या या फिल्डिंगमुळे कगिसो रबाडा चांगलाच भडकला. रबाडा आणि डिकॉक यांच्यामध्ये यावेळी शाब्दिक चकमकही झाली.
— Liton Das (@BattingAtDubai) October 11, 2019
दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या दिवशी फक्त दोनच विकेट घेता आल्या. त्याही अजिंक्य रहाणेने ५९ रन आणि रवींद्र जडेजाने ९१ रन केले. जडेजाची विकेट गेल्यानंतर भारताने लगेचच डाव घोषित केला. कर्णधार विराट कोहली २५४ रनवर नाबाद राहिला.
विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे ७वं द्विशतक होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये ७ द्विशतकं करणारा विराट हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्या ६ द्विशतकांचा विक्रम विराटनो मोडून काढला.