विराट कोहलीने ‘कांगारू’ कर्णधाराला सोडले मागे, केला युनिक रेकॉर्ड

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने साऊथ आफ्रिका दौ-याचा शेवट केला. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 27, 2018, 06:46 PM IST
विराट कोहलीने ‘कांगारू’ कर्णधाराला सोडले मागे, केला युनिक रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने साऊथ आफ्रिका दौ-याचा शेवट केला. 

टीम इंडियाचा दमदार खेळ

टीम इंडियाने तिस-या टी-२० सामन्यात ७ रन्सने विजय मिळवला. तर सीरिज २-१ ने आपल्या नावावर केली. टीम इंडियाने आपल्या साऊथ आफ्रिकेच्या दौ-याची सुरूवात याच मैदानावर टेस्ट सामन्यात पराभवाने केली होती. पण दौ-याचा शेवट विजयाने केला. टीम इंडियाने टेस्ट सीरिज १-२ ने गमावल्यानंतर जोरदार वापसी करत वनडे सीरिजमध्ये ५-१ ने विजय मिळवला आणि नंतर टी-२० सीरिज सुद्धा आपल्या नावावर केली.

या खेळाडूला टाकले मागे

साऊथ आफ्रिकेत कर्णधार विराट कोहलीने दमदार फटकेबाजी केली आणि त्याने काही खास रेकॉर्ड्स आपल्या नावावर केलेत. विराटने साऊथ आफ्रिके विरूद्ध टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये शानदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदा एलन बॉर्डरलाही मागे टाकले. 

विराटची खास कामगिरी

विराट कोहलीने साऊथ आफ्रिकेत नवा इतिहास रचला. साऊथ आफ्रिका दौ-यात सर्वात जास्त रन्स करणा-यांच्या यादीत विराट कोहली दुस-या स्थानावर आला. टेस्टमध्ये कोहलीने ४७.६६ च्या सरासरीने २८६ रन्स केले. ६ वनडेच्या सीरिजमध्ये कोहलीने ५५८ रन्स केले. त्याने तीन शतकं लगावली. कोणत्याही द्विपक्षीय सीरिजमध्ये एखाद्या फलंदाजाने केलेले हे सर्वाधिक शतकं आहेत. 

सर्वात जास्त रन्स करणारा दुसरा कर्णधार

विराट कोहलीने साऊथ आफ्रिका दौ-यात ११ सामन्यांच्या १४ खेळींमध्ये ८७.०० च्या सरासरीने आणि ८२.३८ च्या स्ट्राईक रेट्सोबत ८७१ रन्स केले. ज्यात २ अर्धशतकं तर ४ शानदार शतकांचा समावेश आहे. यासोबतच तो सर्वात जास्त रन्स करणारा दुसरा कर्णधारही झाला. 

साऊथ आफ्रिकेत आपल्या शानदार खेळीने विराटने अनेक दिग्गज क्रिकेटर्सना मागे टाकले आहे. विराट याच दौ-यात ऑस्ट्रेलियाचा माजी महान खेळाडू एलन बॉर्डर याच्याही पुढे गेलाय. एलन बॉर्डरने वर्ष १९८५ मध्ये इंग्लंड विरूद्ध एका दौ-यात १४ खेळींमध्ये ७८५ रन्स केले होते. तेच या यादीत साऊथ आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ हाच विराट कोहलीच्या एक पाऊल पुढे आहे. त्याने २००३ मध्ये इंग्लंड विरूद्ध १६ खेळींमध्ये ९३७ रन्स करत रेकॉर्ड केला होता. 

कर्णधार म्हणून सर्वात जास्त रन्स करणारे खेळाडू

ग्रीम स्मिथ विरूद्ध इंग्लंड - १६ खेळी - रन्स ९३७(२००३)

विराट कोहली विरूद्ध साऊथ आफ्रिका - १४ खेळी - रन्स ८७१ (२०१८)

एलन बॉर्डर विरूद्ध इंग्लंड - १४ खेळी - ७८५ रन्स (१९८५)

एलिस्टर कुक विरूद्ध भारत - १३ खेळी - ७६९ (२०१२)

डिविलियर्सला टाकले मागे

विराट कोहलीने या दौ-यात टेस्टमध्ये २८६ रन्स केले आणि २११ रन्स करणा-या एबी डिविलियर्सला मागे सोडले. विराटने वनडे सीरिजमध्ये १८६ च्या सरासरीने ५५८ रन्स केले. या यादीत दुस-या क्रमांकावर ६४.६० च्या सरासरीने ३२३ रन्ससोबत शिखर धवन आहे.