Ishan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

Updated: Jan 29, 2023, 09:54 AM IST
Ishan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा? title=
India vs New Zealand 2nd T20 playing 11 Ishan Kishan out Shubman Gill new opening partner prithvi shaw timing schedule live

India vs New Zealand 2nd T20  : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये (IND vs NZ) भारतीय संघाचा पराभव झाला आहे. लखनऊमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियासाठी आजचा सामना करो या मरोचा असणार आहे. त्यामुळे पहिल्या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या संघामध्ये मोठे बदल करु शकतो. पहिल्या T20 सामन्यात इशान किशनला त्याच्या नावानुसार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मुंबईचा स्टार खेलाडू इशानला संघातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. (India vs New Zealand 2nd T20 playing 11 Ishan Kishan out Shubman Gill new opening partner prithvi shaw timing schedule live)

हा खेळाडू करणार Shubman Gill सोबत ओपनिंग

शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचे टॉप 3 बॅट्समन फेल गेले.  शुभमन गिल  (Shubhaman Gill) सोबत ओपनिंगला आलेला इशान किशनने केवळ चार धावा केल्या. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्येही इशानने अपेक्षित कामगिरी केली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याने फक्त  40 धावा केल्या.  अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पंड्या दुसऱ्या टी-20 सामन्यात स्टार सलामीवीर पृथ्वी शॉला संधी देऊ शकतो. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. 

या खेळाडूला संधी 

पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध देशांतर्गत क्रिकेटमध्ये 379 धावांची खेळी केली.  ही रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यामुळे तो शुभमन गिलचा नवा ओपनिंग पार्टनर बनू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. 

पृथ्वी शॉची कमाल खेळी 

पृथ्वी शॉ भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी 5 कसोटी सामन्यात 339 धावा, 6 एकदिवसीय सामन्यात 189 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो भारतासाठी एक टी-20 सामनाही खेळला आहे. त्याने 63 IPL सामन्यात 1588 धावा केल्या आहेत. त्याचे कसोटीत 1 शतकदेखील आहे.

लखनऊमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड

आतापर्यंतचा टीम इंडियाचा लखनऊचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे.  दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने टीम इंडियाने खेळले आणि त्यामध्ये विजयही मिळवला. दोन्ही वेळा भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 190+ धावा केल्या आहेत. भारताने या मैदानात श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. त्यामुळे आजचा सामनाही भारत जिंकेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.