'तुम्ही कॉमेन्ट्री बॉक्समध्ये एसीत बसून...'; शामी स्पष्टच बोलला! 'तो' प्रश्न विचारुन हर्षा भोगले फसले

Mohammed Shami Reply To Harsha Bhogle: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमधील दुसरा सामना आज म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 24, 2023, 11:25 AM IST
'तुम्ही कॉमेन्ट्री बॉक्समध्ये एसीत बसून...'; शामी स्पष्टच बोलला! 'तो' प्रश्न विचारुन हर्षा भोगले फसले title=
सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये घडला हा संपूर्ण प्रकार

Mohammed Shami Reply To Harsha Bhogle: इंदूरमध्ये आज (24 सप्टेंबर 2023 रोजी) भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होत आहे. या मालिकेमध्ये आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आराम देण्यात आला आहे. सिराजऐवजी या मालिकेतील भारताचं प्रमुख अस्त्र मोहम्मद शामी असून त्याने पहिल्याच सामन्यात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. त्याने पहिल्या सामन्यात त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शामीने 10 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 51 धावा केल्या. 

ब्रेकमध्ये चर्चा करताना हर्षा भोगलेंनी विचारला तो प्रश्न

मालिकेतील पहिल्या सामन्यातील भन्नाट कामगिरीनंतर शामीने समालोचकांशी संवाद साधला. दोन्ही डावांदरम्यानच्या ब्रेकमध्ये शामीने सामन्यातील कामगिरीबद्दल भाष्य केलं. यावेळेस प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेंनी शामीला प्रश्न विचारला. मोहालीमधील दमट हवामानाचा तुझ्या प्रकृतीवर विपरित परिणाम झाला आहे का? असा प्रश्न हर्षा भोगलेंनी विचारला. यावर शमीने अगदी भन्नाट उत्तर दिलं. हे उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शमीने थेट हर्षा भोगलेंना तुम्हाला मैदानावरील परिस्थितीची जाणीव होणार नाही कारण तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये एसीत बसून असता असं म्हटलं. 

नक्की पाहा Video >> अंपायरच्या अंगात John Cena शिरला अन्...; बॉलर विकेटसाठी अपील करताच काय झालं पाहा Video

नेमका प्रश्न काय अन् शामी काय म्हणाला?

हर्षा यांनी, "तुला आज फार उकाडा जाणवला असेल ना?" असा प्रश्न शामीला विचारला. "हो कदाचित तुम्ही लोक एसी बॉक्समध्ये बसून असता म्हणून आणि आम्ही मैदानात असतो म्हणून," असं शामीने म्हटलं अन् तो हसू लागला. 

उत्तम फलंदाजीची साथ अन् भारताचा विजय

दरम्यान, या मुलाखतीआधीच ऑस्ट्रेलियाचा डाव मर्यादेत धावसंख्येवर संपवण्याच्या जबाबदारीमध्ये शामीने मोठी भूमिका पार पाडली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू बाद झाले आणि त्यांचा डाव 50 ओव्हरमध्ये 276 धावांवर आटोपला. भारताच्या फलंदाजांनी भन्नाट सुरुवात केली. शुभमन गील आणि ऋतुराज गायकवाड यांनी उत्तम फलंदाजी करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये 66 धावा केल्या. या दोघांनी 142 धावांची पार्टनरशीप केली.

नक्की वाचा >> बापरे! वर्ल्डकपआधीच गंभीरने हे काय पोस्ट केलं; विराटचे चाहते संतापून म्हणाले, 'हा घाणेरडा माणूस'

सूर्यकुमार यादव आणि के. एल. राहुल यांनी मधल्या फळीत उत्तम फलंदाजी करत भारताला 6 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मोहालीच्या मैदानात भारताने 1996 नंतर म्हणजेच 27 वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलं.