IND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!

Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय. 

Updated: Jul 15, 2023, 05:30 PM IST
IND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ! title=
Naved ul hasan statement, IND vs PAK

India VS Pakistan: भारत आणि पाकिस्तान म्हणजे पारंपारिक प्रतिस्पर्धी. ज्यावेळी दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने येतात, तेव्हा संपूर्ण देशात जणूकाही एकप्रकारे कर्फ्यू लागलेला असतो. हिंदू असो वा मुस्लिम... सर्वधर्माचे लोक मोठ्या उत्सुकतेना सामना पाहतात आणि टीम इंडियाच्या (Team India) विजयावर चौकाचौकात नाचत जल्लोष देखील करतात. मात्र, खेळाच्या निमित्ताने पाकिस्तानचे कुडगे नेहमी कोणती ना कोणती गरळ ओकत असल्याचं दिसून येतं. अशातच आता पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूंने जावई शोध लावत वायफड बडबड केली आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज राणा नावेद उल हसनने (Naved ul hasan) विष कालवण्यास सुरुवात केली आहे. जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम (Indian Muslims) पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय. त्याला आता भारतीय सोशल मीडियावर चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. 

नेमकं काय म्हणाला? 

भारतात एखादा सामना असेल तर टीम इंडिया फेव्हरेट असते. पाकिस्तानचा संघही चांगला आहे, त्यामुळे आगामी मालिकेत एक रोमांचक सामना खेळवला जाईल. जोपर्यंत प्रेक्षकांचा प्रश्न आहे, मला विश्वास आहे की भारतात मुस्लीम खूप आहेत, त्यामुळे त्यांच्या बाजूने आपल्याला पाठिंबा मिळेल. भारतातील मुस्लिमांचा आम्हाला खूप पाठिंबा आहे. मी भारतात अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये 2 मालिका खेळल्या आहेत, असं राणा नावेद उल हसन याने म्हटलं आहे.

आणखी वाचा - IND vs WI: कॅप्टन रोहितला अचानक काय झालं? LIVE सामन्यात ईशान किशनवर संतापला; पाहा Video

 नावेदने 2004 मध्ये पाकिस्तानसाठी पदार्पण केलं होतं. पण त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही. तो शेवटचा सामना 2010 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता मुलाखती देत राणा नावेद उल हसन वायफळ बडबड करताना दिसतो.

दरम्यान, आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे. त्यानंतर भारतात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला वर्ल्ड कपमध्ये भिडत होणार आहे.